how to transfer pf account : एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत नोकरी बदलणे हे तुमच्या करियरच्या वाढीसाठी आणि विकासासाठी महत्त्वाचे असते. पण अशा प्रकारे नोकरी बदल्यानंतर भविष्य निर्वाह निधी (PF)चा देखील तुम्ही विचार करणे आवश्यक असते. आता ईफीएफओने जुन्या कंपनीतील पीएफ खात्याचे नव्या कंपनीतील हस्तांतरण करण्याची डिजीटल प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. यासाठी एक ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. हीच प्रक्रिया आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत.

आज आपण ऑनलाइन पीएफ खाते कसे ट्रान्सफर करायचे आणि त्यासाठी कागदपत्रे आणि यासाठीचे पात्रतेचे निकष याबद्दल जाणून घेणार आहोत.

पीएफ का ट्रान्सफर करावा?

नोकरी बदलत असताना कर्मचारी त्यांचे जुने पीएफ खाते बंद करू शकतात आणि दुसरे नवीन खाते सुरू करू शकतात किंवा तुमचे जुने खाते नव्या कंपनीमध्ये ट्रान्सफर करू शकतात. अशावेळी बऱ्याचदा पीएफ खाते ट्रान्सफर करण्याचा सल्ला दिला जातो, यामुळे तुम्ही निवृत्ती घेतल्यानंतर तुमच्याकडे एक स्थिर उत्पन्नाचा स्त्रोत तयार होतो. मध्येच पीएफ खात्यातील रक्कम काढून घेतल्याने तुमच्या बचतीवर याचा परिणाम होतो.

ईपीएफ ऑनलाईन ट्रान्सफर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे –

  • युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN)
  • ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स)
  • इस्टॅब्लिशमेंट क्रमांक
  • जुन्या पीएफ खात्याची माहिती
  • फॉर्म १३
  • तुमच्या सॅलरी अकाउंटच्या बँक खात्यासंबंधी माहिती
  • सध्याच्या नियोक्त्याची माहिती

ईपीएफ ऑनलाईन ट्रान्सफर करण्याची पद्धत

एका खात्यातून दुसऱ्या खात्यात ईपीएफ ऑनलाइन कसा ट्रान्सफर कारयाच याबद्दल स्टेप-बाय-स्टेप माहिती –

  • ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर जा आणि तुमचा यूएएन आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • त्यानंतर ‘ऑनलाईन सर्व्हिस’ टॅबवर क्लिक करा
  • ‘वन मेंबर – वन ईपीएफ अकाउंट (ट्रान्सफर रिक्वेस्ट)’ हा पर्याय निवडा.
  • तुमची खाजगी माहिती आणि सध्याच्या कंपनीची पीएफ संबंधित माहिती व्यवस्थित तपासून घ्या.
  • ‘गेट डिटेल्स’ वर क्लिक करा आणि पूर्वीच्या कंपनीची पीएफ संबंधित माहिती तपासून घ्या.
  • डीएससीच्या उपलब्धतेनुसार ट्रान्सफर क्लेम फॉर्म प्रमाणित करण्यासाठी तुमची सध्याचा किंवा मागील कंपनी निवडा.
  • ‘गेट ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करा आणि तुमच्या नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी येथे टाका.
  • ट्रॅकिंग आयटी तुमच्या विनंतीचे स्टेटस तपासण्याकरिता सेव्ह करून घ्या.
  • फॉर्म १३ ची प्रत घ्या आणि त्यावर सही करून तो फॉर्म तुमच्या कंपनीत १० दिवसांच्या आत जमा करा.

तुमची कंपनी ट्रान्सफर रिक्वेस्टची पडताळणी करेल आणि ट्रान्सफरच्या मंजुरीसाठी हा फॉर्म ईपीएफओकडे पाठवेल.

पात्रतेसाठीच्या अटी

एका कंपनीतून दुसर्‍या कंपनीत पीएफ कसा ट्रान्सफर करायचा हे माहिती झाल्यानंतर यासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेच्या अटी आपण जाणून घेणार आहोत, त्या पुढीलप्रमाणे आहेत.

अॅक्टिव्ह यूएएन : पीएफ खाते ट्रान्सफर करण्यासाठी ईपीएफ पोर्टलवर तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर सक्रिय केलेला असणे आवश्यक आहे. याबरोबरच यूएएनशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक देखील सक्रिय असला पाहिजे.

केवायसी डिटेल्स : तुमचे केवायसी तपशील जसे की आधार आणि पॅन कार्ड हे यूएएनशी जोडलेले आणि त्याची पडताळणी झालेली पाहिजे.

बँक तपशील : तुमचा खाते क्रमांक आणि IFSC कोड सारखे तुमच्या कंपनीने व्हेरिफाय केलेले बँकिंग तपशील तुमच्या यूएएनशी जोडलेले असणे आवश्यक आहे.

सेवा कार्यकाळ (Service tenure) : ऑनलाईन ईपीएफ ट्रान्सफर तेव्हाच करता येतो जर तुम्ही सध्याच्या कंपनीत किमान ३ महिने काम केले असेल.

ईपीएफ खाते : तुम्ही जात असलेल्या नव्या कंपनीकडे चालू ईपीएफ खाते (तुमच्या युएएनशी लिंक केलेले) असणे आवश्यक आहे.

पीएफ ट्रान्सफरचे स्टेटस कसे तपासायचे?

ट्रान्सफर स्टेटस ऑनलाइन तपासण्यासाठी तुम्हाला पुढील गोष्टी कराव्या लागतीस

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • ईपीएफ मेंबर पोर्टलला भेट द्या
  • तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • ‘ऑनलाइन सर्व्हिस’ टॅबवर जा आणि ‘ट्रॅक क्लेम स्टेटस’ वर क्लिक करा.
  • ‘ट्रानसफर स्टेटस क्लेम’ याखाली देण्यात आलेला क्लेमची स्थिती तुम्ही येथे पाहू शकता.

कंपनीने तुमची ट्रान्सफर करण्याची विनंती मंजूर केल्यानंतर, या स्क्रीनवर ‘Accepted by Employer’ असे अपडेट दिसेल.