नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा विकास दर मंदावण्याची चिन्हे आहेत. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनातील घट आणि रबी हंगामातील कमी पेरणी यामुळे विकास दर ६ टक्क्यांच्या खाली नोंदविला जाईल, असा अंदाज ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेने गुरुवारी वर्तविला. ‘इक्रा बिझनेस ॲक्टिव्हिटी मॉनिटर’मध्ये सलग दुसऱ्या महिन्यात डिसेंबरमध्ये घट नोंदविण्यात आली असून, तो ८.१ टक्के नोंदविण्यात आला. ही निर्देशांकाची सहा महिन्यांतील नीचांकी पातळी आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात तो ९.६ टक्के, तर डिसेंबर २०२२ मध्ये ७.९ टक्के होता. सणासुदीचा कालावधी संपल्यामुळे व्यवसायांमधील वृद्धी कमी झाली. याचबरोबर वीज आणि पेट्रोलच्या मागणीतही घट झाली आहे.

हेही वाचा >>> तुमचा आवडता हल्दीराम ब्रँड आता नवीन कंपनी खरेदी करण्याची तयारीत

five trillion dollar economy
विश्लेषण: रुपयातील घसरणीने पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्टच अवघड?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
Volkswagen german factory marathi news
विश्लेषण: जर्मनीतील फोक्सवागेन कार कंपनीचा कारखाना बंद होणार? आर्थिक मंदीची लक्षणे?
nsa ajit doval to visit russia for brics meeting
अजित डोभाल यांचा ‘ब्रिक्स’ बैठकीसाठी रशिया दौरा; रशिया-युक्रेन युद्धावर चर्चेची शक्यता
Sensex, Mumbai stock market, Sensex fallen,
विश्लेषण : उच्चांकी पातळीवर पोहोचलेला मुंबई शेअर बाजार ‘सेन्सेक्स’ पुन्हा का  कोसळला? पडझड किती काळ सुरू राहणार?
russia missile strike on ukraine
Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी
Economists predict gdp rate marathi news
विकासदर पाच तिमाहीतील नीचांक गाठणार, जून तिमाहीत ६.८ टक्क्यांपर्यंत घसरणीचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज

कृषी क्षेत्रात शून्यवत वाढ

देशाचा विकास दर सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ७.६ टक्के नोंदविण्यात आला होता. इक्रा पतमानांकन संस्थेने म्हटले आहे की, ऑक्टोबर ते नोव्हेंबर कालावधीत सरकारकडून भांडवली खर्चात कपात करण्यात आली. खरीप हंगामातील पिकांच्या उत्पादनातील मोठी घसरण आणि रबी हंगामातील पिकांच्या पेरणीत झालेली घट यामुळे कृषी क्षेत्राच्या सकल मूल्यवर्धनात (जीव्हीए) किचिंत अथवा काहीच वाढ दिसून न येण्याचा अंदाज आहे. या सर्व कारणांमुळे तिसऱ्या तिमाहीत विकास दर ६ टक्क्यांच्या खाली नोंदला जाईल. चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत तो ७.६ टक्के होता. विजेची मागणी यंदा १ ते १५ जानेवारी या कालावधीत मागील वर्षातील जानेवारीच्या तुलनेत किरकोळ ३.४ टक्क्यांनी वाढली. डिसेंबरच्या तुलनेत ही मागणी १.६ टक्क्याने अधिक आहे. यंदा १ ते १७ जानेवारी या कालावधीत नवीन वाहनांची दैनंदिन सरासरी नोंदणी मागील वर्षातील जानेवारीपेक्षा ३९.२ टक्के अधिक आहे. मात्र, सरलेल्या डिसेंबर महिन्याच्या तुलनेत जानेवारीतील दैनंदिन वाहन नोंदणी १.८ टक्क्याने कमी आहे. याला पितृ पक्ष कारणीभूत ठरला आहे. हिंदू परंपरेप्रमाणे कोणत्याही नवीन कार्य आणि खरेदीसाठी हा अशुभ काळ मानला जातो, त्यामुळे वाहनासह इतर गोष्टींची या काळात खरेदी परंपरेने कमी असते, असे इक्राने नमूद केले आहे.