TCS Hiring Freshers: IT शिक्षण घेतलेल्यांसाठी TCS कडून मोठी बातमी समोर येत आहे. कंपनीचे सीओओ एन गणपती सुब्रमण्यम यांनी कंपनी लवकरच आर्थिक वर्ष २०२४ साठी ४० हजार प्रशिक्षणार्थी भरती (campus recruits) करणार आहे. सध्या आयटी क्षेत्रातील बहुतेक कंपन्या रिक्त पदांवर नवीन भरती करीत नाही आहेत. त्यामुळेच टीसीएसचे हे पाऊल मोठे मानले जात आहे. विशेष म्हणजे चौथ्या तिमाहीचे निकाल आल्यानंतर कंपनीने याबाबत माहिती दिली आहे.

Infosys ची अजून कोणतीही योजना नाही

Infosys बद्दल बोलायचे झाल्यास कंपनीचे CFO निलांजन रॉय म्हणतात की, आम्ही गेल्या वर्षी ५० हजार नवीन भरती केली होती, त्यामुळे या वर्षासाठी कंपनीची नव्या नोकऱ्यांची भरती करण्यासंदर्भात कोणतीही योजना नाही. अशा परिस्थितीत टीसीएसची ही मागणी खूप मोठी मानली जात आहे.

हेही वाचाः केरळमध्ये अदाणींचे नवे बंदर, २० हजार कोटींची गुंतवणूक करणार अन् बरंच काही, जाणून घ्या

TCS मध्ये सध्या ६,१४,७९५ कर्मचारी

एकूण कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचे झाल्यास सध्या कंपनीत ६,१४,७९५ लोक काम करीत आहेत. याशिवाय सीओओ एन गणपती सुब्रमण्यम यांनी सांगितले की, सुमारे १० टक्के म्हणजेच ६० हजार विद्यार्थी प्रशिक्षण कालावधीत आहेत. याचा अर्थ येत्या काळात म्हणजे एका वर्षात ते देखील कंपनीचा भाग बनतील.

हेही वाचाः मोठी बातमी! TCS भरती घोटाळ्यात १६ कर्मचाऱ्यांना काढून टाकले, IT कंपनीने ६ वेंडर्सवर घातली बंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

TCS चमकदार कामगिरी करतेय

याशिवाय गेल्या महिन्यात कंपनीने सांगितले होते की, गेल्या काही वर्षांपासून आम्ही ०-३ वर्षांचा अनुभव असलेल्या लोकांना कामावर घेत आहोत. तर यावेळी आम्ही फ्रेशर्ससाठी भरती सुरू केली आहे. कंपनीच्या सप्टेंबर तिमाहीच्या निकालांबद्दल बोलायचे झाल्यास निव्वळ नफा ११,३४२ कोटी रुपये होता.