गेल्या नऊ वर्षांत भारतातील मूलभूत सुविधांचा विकास आणि कोरोनाच्या काळात सरकारने केलेल्या प्रयत्नांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर सर्व देशी-विदेशी संस्थांचा विश्वास वाढत आहे. भारतीय अर्थव्यवस्था चीननंतर जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल, असा अंदाजही गोल्डमन सॅक्सने वर्तवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाची १.४ अब्ज लोकसंख्या असलेल्या भारताचा जीडीपी वाढण्याची अपेक्षा आहे आणि २०७५ पर्यंत देश जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असे गोल्डमन सॅक्सच्या संशोधनात आढळून आले आहे. भारताची अर्थव्यवस्था ५२.५ ट्रिलियन डॉलरची असेल, विशेष म्हणजे ती अमेरिकेपेक्षा मोठी आणि चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर असेल, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

गोल्डमन सॅक्स रिसर्चचे भारताचे अर्थशास्त्रज्ञ संतनू सेनगुप्ता म्हणाले की, भारताच्या वाढत्या लोकसंख्येच्या क्षमतेचा वापर करण्याची गुरुकिल्ली म्हणजे त्यांच्या श्रमशक्तीमधील सहभागाला चालना देऊन त्यांच्या प्रतिभा समूहाला प्रशिक्षण आणि कौशल्य मिळवून देणे महत्त्वाचे आहे. येत्या दोन दशकांमध्ये भारताचे अवलंबित्व गुणोत्तर प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात कमी असेल. त्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ करणे, सेवा वाढवणे, सतत वाढ करत राहण्याच्या बाबतीत भारताला पायाभूत सुविधा विकसित करण्याची खरोखरच गरज आहे, असंही अहवालात सेनगुप्ता म्हणालेत.

भारताची नवकल्पना आणि तंत्रज्ञानामध्ये अधिक प्रगती

विशेष म्हणजे भारताच्या लोकसंख्येमध्ये कार्यरत व्यक्तींच्या लोकसंख्येत मुलांची अन् वृद्धांची संख्या यांच्यातील प्रमाण सर्वोत्तम गुणोत्तरांपैकी एक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भारताने नवकल्पना आणि तंत्रज्ञानामध्ये अधिक प्रगती केली आहे. खरं तर देशाच्या बाजूने लोकसंख्याशास्त्र आहे, परंतु यासाठी जीडीपी एकमेव चालक ठरणार नाही. नावीन्य आणि कामगार उत्पादकता वाढवणे हे जगासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. तांत्रिक भाषेत याचा अर्थ भारताच्या अर्थव्यवस्थेतील श्रम आणि भांडवलाच्या प्रत्येक युनिटसाठी अधिक उत्पादन वाढवणे आवश्यक आहे, असे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचाः ‘या’ चार भारतीय महिलांनी फोर्ब्सच्या यादीत मिळवले स्थान, हे आहे कारण

“भांडवली गुंतवणूकसुद्धा जीडीपी वाढीचा एक महत्त्वाचा चालक ठरणार आहे. भारतात लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण आशियाच्या इतर भागांपेक्षा हळूहळू आणि दीर्घ कालावधीत होत आहे. हे प्रामुख्याने उर्वरित आशियाच्या तुलनेत भारतातील मृत्यू आणि जन्मदरात अधिक हळूहळू घट झाल्यामुळे आहे, असे अहवालात म्हटले आहे. जर भारतातील श्रमशक्तीचा सहभाग वाढला नाही, तर भारताची मोठी संधी वाया जाऊ शकते, असा इशाराही अहवालात देण्यात आला आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये भारतातील श्रमशक्तीचा सहभाग दर कमी झाला आहे. महिलांच्या श्रमशक्तीचा सहभाग दर पुरुषांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे, तुम्ही तुमच्या श्रमशक्तीचा सहभाग दर वाढवू शकता, जे तुमची संभाव्य वाढ आणखी वाढवू शकते,” अहवालात सांगितले आहे.

हेही वाचाः Money Mantra : टाटा समूहाच्या ५ सर्वोत्तम योजना; १ लाखाच्या बदल्यात ६.७ लाखांपर्यंत फायदा

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India can become worlds number two economy by 2075 says goldman sachs vrd
First published on: 11-07-2023 at 11:42 IST