अर्चित ग्रोव्हर या ३६ वर्षीय भारतीय वंशाच्या व्यक्तीला कॅनडाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या सोन्याच्या चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सुमारे महिनाभरापूर्वी या चोरीत सहभागी असलेल्या अन्य पाच जणांनाही अटक करण्यात आली होती. टोरंटो विमानतळावरील एका मालवाहू कंटेनरमधून १७ एप्रिल २०२३ रोजी बनावट कागदपत्रांचा वापर करून २२ दशलक्ष कॅनेडियन डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे सोन्याचे बार आणि परकीय चलन चोरीला गेले, असे पोलिसांनी सांगितले. विमान उतरल्यानंतर माल उतरवून विमानतळावर वेगळ्या ठिकाणी नेण्यात आला, मात्र दुसऱ्या दिवशी तो चोरीला गेल्याची बातमी पोलिसांना मिळाली.

अर्चितला भारतातून परतल्यानंतर टोरंटो विमानतळावर अटक

भारतातून परतल्यानंतर अर्चितला ६ मे २०२४ रोजी टोरंटो विमानतळावरून अटक करण्यात आली होती. यापूर्वी पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी संपूर्ण कॅनडामध्ये वॉरंट जारी केले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी टोरंटोमधील पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर तपास यंत्रणांनी अर्चित ग्रोव्हरला अटक केली आणि त्याच्यावर गंभीर आरोप लावले. पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलिसांनी यापूर्वी त्याच्या अटकेसाठी कॅनडाभर वॉरंट जारी केले होते. ३६ वर्षीय तरुणावर कॅनेडियन डॉलर ५ हजाराची चोरी आणि अदखलपात्र गुन्ह्याचा कट रचल्याचा आरोप आहे, असेही पोलिसांनी गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे. ग्रोव्हर ज्याला आर्ची म्हणूनही ओळखले जाते.

hezbollah fires 200 rockets at Israel after senior commander killed
हेजबोलाचे इस्रायलवर रॉकेट हल्ले; युद्धविरामाचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाल्यानंतरही प्रादेशिक तणाव वाढण्याची भीती
274 Palestinians killed in Israeli attack
इस्रायलच्या हल्ल्यात २७४ पॅलेस्टिनी ठार; हमासच्या ताब्यातील ४ ओलिसांची सुटका करण्यात यश
Kanyakumari New Resolution Through Spiritual Sadhana Narendra Modi Opinion
कन्याकुमारीतील साधनेतून नवे संकल्प आकाराला…
prajwal revanna
महिन्याभरानंतर भारतात परतलेल्या प्रज्वलला विमानतळावरच अटक, व्हिडिओतील आवाजाचे नमुने गोळा करणार?
What are evacuation slides Passengers evacuated from Indigo flight after bomb scare
बॉम्बच्या अफवेनंतर विमानातील प्रवाशांच्या सुटकेसाठी ‘इव्हॅक्युएशन स्लाईड्स’चा वापर कशाप्रकारे करण्यात येतो?
Dhruv Rathi
युट्यूबर ध्रुव राठीला जीवे मारण्याची धमकी; एक्स पोस्टवर म्हणाला, “या सगळ्यामागे…”
Prajwal revanna diplomatic passport
प्रज्ज्वल रेवण्णा डिप्लोमॅटिक पासपोर्टच्या बळावर देशातून फरार; हा पासपोर्ट कोणाला मिळतो?
Adani six shares at pre Hindenburg levels print eco news
अदानींचे सहा समभाग हिंडेनबर्ग-पूर्व पातळीवर; अदानी पोर्ट्सचा ‘सेन्सेक्स’मध्ये लवकरच समावेश

नेमका घटनाक्रम काय?

स्वित्झर्लंडची राजधानी झुरिच येथून उड्डाण केल्यानंतर एअर कॅनडाचे एक मालवाहू विमान कॅनडातील टोरंटो विमानतळावर उतरले. या विमानात ६६०० सोन्याच्या विटा आणि स्वित्झर्लंडमधील धातू शुद्धीकरण कंपनीकडून १.९ दशलक्ष कॅनेडियन डॉलर्सचे चलन एका बॉक्समध्ये भरलेले आहे, जे वितरीत केले जाणार होते. ६ हजार ६०० सोन्याच्या बारांचे वजन म्हणजे सोन्याच्या विटांचे वजन ९०० पौंड म्हणजेच सुमारे ४०० किलो आहे आणि खुल्या बाजारात त्याची किंमत अंदाजे २० दशलक्ष कॅनेडियन डॉलर्स म्हणजे सुमारे १२२ कोटी रुपये आहे. यामध्ये कॅनेडियन डॉलरचे चलनदेखील जोडले तर संपूर्ण मालाची रक्कम अंदाजे १३२ कोटी रुपये होते. एअर कॅनडाच्या या विमानात भरलेल्या या गोष्टी अतिशय मौल्यवान आहेत आणि त्यांची काळजी आणि सुरक्षितताही तितकीच महत्त्वाची होती. त्याचं झालं असं की, एअर कॅनडाच्या त्याच गोदामात एक पांढरा बॉक्सचा ट्रक पोहोचतो, जिथे एअर कॅनडाच्या त्या मालवाहू विमानातून अनलोड केलेली मौल्यवान शिपमेंट ठेवली जाते. ट्रकच्या ड्रायव्हरकडे एअर वे बिल आहे, जे झुरिचहून आलेल्या शिपमेंटचे तपशील नोंदवते. तो त्याचे बिल वेअरहाऊसमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना देतो आणि सांगतो की, झुरिचहून पाठवलेले शिपमेंट हे जगातील सर्वोत्तम सीफूड म्हणजेच अटलांटिक सॉलोमन मासे भरलेले आहे, जे त्याला पुढे द्यायचे आहे. वेअरहाऊसमध्ये उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना शिपमेंटमध्ये असलेल्या मालाची माहिती नसते. ते उर्वरित कागदपत्रे ड्रायव्हरकडे असलेल्या एअर-वे बिलाशी जुळवून पाहतात आणि झुरिचहून शिपमेंट ड्रायव्हरला देतात. म्हणजेच सोन्याच्या विटा आणि चलन जे झुरिचहून आले होते, ते माशांच्या स्वरूपात त्या पांढऱ्या रंगाच्या बॉक्स ट्रकमध्ये भरले जाते आणि दुसऱ्याच क्षणी गोदामातून बाहेर पडून सर्व चौक्या ओलांडून ट्रक बाहेरच्या जगात एकदम फ्लिमी स्टाइलने गायब होतो.

हेही वाचाः दोन मतदारसंघात निवडणूक कशी लढवली जाते? काय आहेत नियम?

त्यानंतर कॅनडाच्या पोलिसांनी अमेरिकेतील अल्कोहोल, तंबाखू, बंदुक आणि स्फोटके (ATF) ब्युरोच्या सहकार्याने तपास सुरू केला. आधीच्या निवेदनात पोलिसांनी सांगितले की, तपास यंत्रणांनी अंदाजे कॅनेडियन डॉलर्स किमतीचे चोरीला गेलेले एक किलोग्राम सोने जप्त केले. त्याची कॅनेडियन चलनातील अंदाजे किंमत ४३४,००० डॉलर्स असल्याचे मानले जाते. चोरीच्या सोन्याचा सीमापार चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशनमध्ये निधीचा पुरवठा करण्यासाठी वापर केला जात असल्याचीही पोलिसांना माहिती मिळाली. गेल्या महिन्यात दोन भारतीय वंशाचे परमपाल सिद्धू(५४) आणि अमित जलोटा(४०) यांना अटक केली होती. तर अम्माद चौधरी (४३), अली रझा (३७) आणि प्रथश परमलिंगम (३५) यांनाही अटक करण्यात आली होती. तर या चोरीत मदत करणारा एअर कॅनडाचा माजी कर्मचारी अद्याप अटकेबाहेर आहे.

हेही वाचा: Covid-19 : ‘FLiRT’मुळे करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ; हा नवा अवतार किती घातक?

परंतु या प्रकरणातील खरी गुंतागुंत ही सुमारे ५ महिन्यांनंतर समोर आली आहे, जेव्हा पेनसिल्व्हेनिया यूएसए येथे पोलिसांनी एका २५ वर्षीय तरुणाला किरकोळ वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी चौकशीसाठी थांबवले. पण फ्रँकलिन काउंटी पोलिसांनी पेनसिल्व्हेनियाजवळ थांबलेल्या या ट्रक चालकाची चौकशी करून त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्याच्या भाड्याच्या कारमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ६५ बंदुका आढळून आल्याने पोलीस चक्रावून गेले. इतकेच नव्हे, तर पोलिसांना दोन पूर्णपणे स्वयंचलित हँडगन देखील सापडल्या, ज्या मशीन गनमध्ये बदलल्या गेल्या होत्या. वाहतुकीचा नियम मोडण्याच्या योगायोगाने उघडकीस आलेले शस्त्र तस्करीचे हे खळबळजनक प्रकरण होते हेसुद्धा एव्हाना समोर आले होते. हा व्यक्ती अमेरिका आणि कॅनडामधील शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या रॅकेटशी संबंधित असल्याचे पोलिसांना समजले. पण जेव्हा अमेरिकन आणि कॅनडाच्या पोलिसांना या २५ वर्षीय तरुणाची खरी ओळख पटली तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून एअर कॅनडाच्या गोदामातून सोन्याच्या विटा आणि कॅनेडियन डॉलर्स घेऊन गेलेल्या व्हाईट बॉक्स ट्रकचा चालक होता, त्याला कॅनडा आणि अमेरिकेच्या पोलिसांनी घटनेनंतर लगेचच म्हणजेच एप्रिलमध्ये अटक केली होती, ज्याला पोलीस २०२३ पासून शोधत होते. खरं तर, अमेरिकन पोलिसांनी त्यांच्या गुन्हेगारी डेटाबेसमध्ये त्याचे रेकॉर्ड तपासले, तेव्हा त्याची ओळख स्पष्ट झाली.