आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत देशातील आर्थिक वाढ ८.४ टक्के दराने झाली आहे. देशाचा जीडीपी तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्के होता, जो चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत ७.६ टक्के राहिला होता. गेल्या आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीत जीडीपी ४.४ टक्के होता. सांख्यिकी मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी GDP चा दुसरा आगाऊ अंदाज देखील जारी केला आहे. या आकडेवारीनुसार, भारताचा आर्थिक विकास दर म्हणजेच GDP चालू आर्थिक वर्षात ७.६ टक्के असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, जो २०२२-२३ मध्ये ७ टक्के होता.

भारतीय अर्थव्यवस्था वेगानं वाढतेय

आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीसाठी डेटा जारी करताना सांख्यिकी मंत्रालयाच्या NSO (नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस) ने महत्त्वाची माहिती दिलीय. भारतीय अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत ८.४ टक्के वाढ दर्शविली आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीत GDP ४०.३५ लाख कोटी रुपयांवरून चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ४३.७२ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. उत्पादन क्षेत्राचा विकास दर ११.६ टक्के आहे आणि बांधकाम क्षेत्राचा विकास दर ९.५ टक्के आहे. तर जीडीपी ८.४ टक्के आहे, असंही सांख्यिकी मंत्रालयाच्या एनएसओने सांगितले. या आर्थिक वर्षात GDP ७.६ टक्के असण्याचा अंदाज आहे, जो २०२२-२३ मध्ये ७ टक्के होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात वास्तविक जीडीपी १७२.९० लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे, जो २०२२-२३ मध्ये १६०.७१ लाख कोटी रुपये होता.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India economy grew by 8 4 percent in the third quarter vrd
First published on: 29-02-2024 at 20:41 IST