२०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी ७ टक्क्यांहून अधिक दराने वाढू शकतो, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या वतीने बुधवारी देण्यात आली. जेव्हा अशा प्रकारचा जीडीपी वाढीचा दर समोर येतो, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. कारण गेल्या आर्थिक वर्षातील जीडीपी वाढीचा दर अंदाजापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी अधोरेखित केलंय.

आधी अंदाज काय होता?

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) निर्णयांची माहिती देताना RBI गव्हर्नर यांनी २०२२-२३ मध्ये भारताचा GDP ७ टक्के दराने वाढण्याची अपेक्षा असल्याचं सांगितलं होतं.

२०२३-२४ साठी GDP वाढीचा अंदाज काय?

आरबीआय गव्हर्नरने एप्रिलमध्ये म्हटले होते की, २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढ सुमारे ६.५ टक्के असू शकते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढ ७.८ टक्के, दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ ६.४ टक्के, तिसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढ ६.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत जीडीपी वाढ ५.९ टक्के असू शकते.

हेही वाचाः मोदी सरकारकडून आधी बँकांचं खासगीकरण अन् आता सरकारी तेल कंपन्यांच्या विलीनीकरणाची तयारी, नेमका फायदा काय?

जागतिक संस्थांद्वारे भारताच्या GDP चा अंदाज काय?

या वर्षाच्या सुरुवातीला IMF आणि जागतिक बँक या दोघांनीही भारतीय GDP वाढीच्या दराबाबत अंदाज जाहीर केले होते. २०२२-२३ या आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी विकास दर ६.८ टक्के असू शकतो आणि भारतीय अर्थव्यवस्था ६.९ टक्के दराने वाढू शकते, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.

हेही वाचाः रिलायन्स जिओ मार्टमध्ये नोकर कपात; १००० हून अधिक कर्मचाऱ्यांना दिला नारळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था?

सध्या भारताची अर्थव्यवस्था अशा वेळी विकसित होत आहे, जेव्हा पाश्चिमात्य देशात मंदी येण्याची शक्यता आहे. भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, ज्यांचा अंदाज ७ टक्क्यांहून अधिक आहे.