मुंबई : डॉलरच्या तुलनेत रुपयात घसरण तीव्र झाली असून प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. गुरुवारी त्याने ८४.८८ असा प्रति डॉलर ऐतिहासिक नीचांक नोंदविला. आंतरबँक चलन व्यवहारात रुपया अखेर ४ पैशांनी घसरून ८४.८७ या नीचांकी पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील घसरण, खनिज तेलाचा उडालेला भडका आणि भांडवली बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अविरतपणे समभाग विक्रीचा मारा आणि गुंतलेला पैसा काढून घेण्याचा क्रम सुरू आहे. परिणामी डॉलरची मागणी वाढली असून, त्यापरिणामी रुपया अधिक कमजोर झाला आहे.

हेही वाचा : सेन्सेक्सची २३६ अंशांनी माघार

आंतरबँक चलन व्यापारात रुपयाने ८४.८५ रुपयांवरून व्यवहाराला सुरुवात केली. सत्रादरम्यान, रुपयाने प्रति डॉलर ८४.८८ या नीचांकी पातळीला स्पर्श केला. रुपयाची मागील विक्रमी नीचांकी पातळी विद्यमान महिन्यात म्हणजेच ९ डिसेंबर रोजी नोंदवली गेली होती, जेव्हा तो डॉलरच्या तुलनेत २० पैशांनी कमी होऊन ८४.८६ वर स्थिरावला होता. अमेरिकी डॉलर निर्देशांका देखील १०६.२२ पातळीवर पोहोचला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.