वृत्तसंस्था, नवी दिल्ली

इंडिगोचे सहसंस्थापक राकेश गंगवाल हे स्पाईसजेट या विमान कंपनीतील मोठा हिस्सा विकत घेण्याच्या तयारीत आहेत. याबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. या घडामोडीमुळे स्पाईसजेटच्या समभागाने शुक्रवारी २० टक्के उसळी घेतली.

इंडिगोची पालक कंपनी इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये गंगवाल यांचा १३.२३ टक्के हिस्सा असून, त्यांच्या पत्नी शोभा गंगवाल यांचा २.९९ टक्के हिस्सा आहे. याचवेळी गंगवाल यांच्या चिंकरपू फॅमिली ट्रस्टचा कंपनीत १२.५ टक्के हिस्सा आहे. स्पाईसजेट ही सध्या अडचणीत आली आहे. कंपनीच्या अस्तित्वाची लढाई सुरू असून, निधी उभारण्यासाठी कंपनीचे प्रयत्न चालू आहेत. कंपनीच्या ताफ्यात एक चतुर्थांश विमाने सध्या बंद असून, ती पुन्हा सुरू करण्यासाठी कंपनी पावले उचलत आहे.

हेही वाचा… व्यापार तूट पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर; सप्टेंबरमध्ये ३० टक्के घसरणीसह १९.३७ अब्ज डॉलरवर मर्यादित

हेही वाचा… आघाडीच्या आयटी कंपन्यांतील मनुष्यबळात घट; टीसीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेकमध्ये नवीन भरती कमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील हवाई वाहतूक क्षेत्रातील स्पाईसजेटचा हिस्सा सप्टेंबर अखेर ४.४ टक्क्यांवर घसरला आहे. यंदा जानेवारीअखेर हा हिस्सा ७.३ टक्के होता. गंगवाल हे स्पाईसजेटचा हिस्सा विकत घेणार असल्याला कंपनीने उद्याप दुजोरा दिलेला नाही. हिस्सा विक्रीच्या चर्चेमुळे स्पाईसजेटच्या समभागात शुक्रवारी २० टक्क्यांची वाढ होऊन तो ४३.६० रुपयांवर बंद झाला.