मुंबई : देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने गुरुवारी टीसीएसपाठोपाठ चौथ्या तिमाहीत चांगल्या कामगिरीची नोंद करत ७,९६९ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात ३० टक्क्यांची दमदार वाढ झाली आहे. बेंगळूरु येथे मुख्यालय असलेल्या इन्फोसिसने गेल्या वर्षी याच काळात ६,१२८ कोटी रुपयांचा करपश्चात नफा नोंदविला होता.

कंपनीने जानेवारी ते मार्च २०२४ या चौथ्या तिमाहीत ३७,९२३ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. वार्षिक तुलनेत त्यात केवळ १.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत ३७,४४१ कोटींच्या महसुलाची कंपनीने नोंद केली होती.

oil india achieves record profit in 4 quarter
ऑइल इंडियाला तिमाहीत सर्वोच्च नफा; भागधारकांसाठी बक्षीस समभागाचीही घोषणा  
public sector banks total profit crosses rs 1 4 lakh crore in fy 24
सरकारी बँकांचा एकूण नफा १.४० लाख कोटींपुढे 
wholesale inflation hit 13 month high at 1 26 percent in april
घाऊक महागाई एप्रिलमध्ये १.२६ टक्क्यांसह १३ महिन्यांच्या उच्चांकी
profit, government banks,
सरकारी बँकांचा एकूण नफा १.४० लाख कोटींपुढे
12986 crore profit to government oil companies
सरकारी तेल कंपन्यांना १२,९८६ कोटींचा नफा
17528 crore profit with triple growth for Tata Motors
टाटा मोटर्सला तिप्पट वाढीसह १७,५२८ कोटींचा नफा
gst revenue collection hits record high of rs 2 10 lakh crore in april
जीएसटी संकलन प्रथमच विक्रमी २.१० लाख कोटींवर ; वार्षिक तुलनेत १२.४ टक्के वाढ
Indian oil s quarterly net profit slashed by 40 percent due small cut in fuel price before elelction
निवडणूकपूर्व इंधन दरकपातीचा फटका; इंडियन ऑइलच्या तिमाही निव्वळ नफ्याला निम्म्याने कात्री  

हेही वाचा >>> लवकरच जग्वार लँड रोव्हरचे भारतात उत्पादन; टाटा मोटर्सचे नियोजन; तमिळनाडूमध्ये उभारणार १ अब्ज डॉलरचा प्रकल्प

सरलेल्या २०२३-२४ या संपूर्ण आर्थिक वर्षांत इन्फोसिसने २६,२३३ कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. जो त्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत ८.९ टक्क्यांनी अधिक राहिला आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात म्हणजेच २०२२-२३ या कालावधीत कंपनीने वर्षभरात २४,०९५ कोटींचा नफा मिळविला होता. तर महसुलाच्या आघाडीवर ४.७ टक्क्यांची वाढ नोंदवत १,५३,६७० कोटी रुपयांची महसूल प्राप्ती केली आहे. आधीच्या आर्थिक वर्षांत कंपनीने १,४६,७६७ कोटी रुपयांचा महसूल मिळविला होता. कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांना खूश करताना, पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी २० रुपये अंतिम लाभांश आणि ८ रुपये विशेष लाभांश देण्याची शिफारस केली आहे. म्हणजेच एकत्रित २८ रुपयांचा लाभांश गुंतवणूकदारांच्या पदरी पडणार आहे. इन्फोसिसने जर्मनीमधील इन-टेक कंपनीचे सुमरे ४,००० कोटी रुपयांना अधिग्रहण करण्याचे जाहीर केले.

हेही वाचा >>> Gold-Silver Price on 18 April 2024: सोन्याच्या भावात फेरबदल, १० ग्रॅमचा दर आता…

इन्फोसिसने सरलेल्या आर्थिक वर्षात विविध परदेशी कंपन्यांशी १७.७ अब्ज डॉलर मूल्याचे एकूण करार केले होते, ज्यात ५२ टक्के नवीन करारांचा समावेश होता. शिवाय कंपनी कृत्रिम विदा अर्थात एआयमधील क्षमता विस्तारत असल्याने त्याचा फायदा कंपनीला झाला. सतत होणाऱ्या डिजिटल परिवर्तनामुळे प्रकल्प राबविण्याच्या त्यांच्या गरजेनुरूप ग्राहकांच्या कराराला प्राधान्य देण्यात येत आहे, परिणामी कंपनीने सरलेल्या तिमाहीत दमदार कामगिरी केली आहे, असे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी सांगितले.

कर्मचारी संख्येत घट

गेल्या २३ वर्षाच्या कालावधीत प्रथमच  इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली. सरलेल्या आर्थिक वर्षात कर्मचारी संख्या २५,९९४ ने कमी होत ३,१७,२४० वर पोहोचली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कर्मचारी संख्येत ७.५ टक्क्यांची घसरण झाली आहे.