मुंबई : कृत्रिम फुले, शोभिवंत भेटवस्तू तसेच घर कार्यालय आणि मॉल, छोटेखानी सभा-समारंभाचे ठिकाण सजवण्याचे साहित्य या क्षेत्रात १२ वर्षांचा समृद्ध अनुभव असलेल्या इंटिरिअर्स अँड मोअर लिमिटेड या कंपनीने प्रारंभिक समभाग विक्रीतून (आयपीओ) ४२ कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे.

हेही वाचा >>> ‘उल्लू डिजिटल’ची १५० कोटी निधी उभारणीची योजना; एसएमई मंचावरील सर्वात मोठा ‘आयपीओ’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर समभागांच्या सूचीबद्धतेसाठी असलेला हा कंपनीचा आयपीओ १५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला राहिल. प्रति समभाग २१६ ते २२७ रुपये या किंमतश्रेणीत वैयक्तित गुंतवणूकदारांना किमान ६०० समभागांसाठी बोली लावून या प्रक्रियेत सहभागी होता येईल. यामाध्यमातून उभारला जाणारा निधी विशिष्ट कर्जांच्या परतफेडीसाठी/मुदतपूर्व परतफेडीसाठी तसेच खेळत्या भांडवलाची गरज पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल. ग्रेटेक्स कॉर्पोरेट सर्व्हिसेस लिमिटेड या आयपीओचे व्यवस्थापन म्हणून काम पाहात आहे.