तुम्हीही आगामी काळात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण देशात १ एप्रिलपासून फक्त तेच सोन्याचे दागिने आणि वस्तू विकल्या जातील ज्यावर ६ अंकी हॉलमार्क अल्फान्यूमेरिक युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) नंबर असेल. अर्थात सोन्यासाठी ही सहा अंकांची होलमार्क सिस्टीम अनिवार्य असणार आहे. सरकारने शनिवारी यासंदर्भात माहिती दिली आहे.

यामुळे ३१ मार्चनंतर सोने दुकानदारांना एचयूआयडी हॉलमार्क नंबरशिवाय जुने हॉलमार्कचे दागिने विकण्याची परवानगी नसेल. १८ जानेवारी २०२३ रोजी ग्राहकांचे हित सुरक्षित करण्यासाठी सर्व संबंधीत यंत्रणेशी सल्लामसलत करत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

सोनं खरेदी करताय? भारतातील ‘या’ शहरांमध्ये मिळतं सर्वात स्वस्त सोनं, नाव ऐकून हैराण व्हाल!

१ जुलैपासून दागिन्यांवर हॉलमार्किंग होते अनिवार्य

गोल्ड हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र असते. १६ जून २०२१ पासून देशात ही सिस्टम स्वेच्छेने लागू करण्यात आली. तर सहा अंकी HUID नंबरची सिस्टम १ जून २०२१ पासून लागू करण्यात आलाीआहे. यावेळी ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जाहीर केले होते की, ग्राहकांकडे असलेले जुने हॉलमार्क असलेले दागिने वैध राहतील. यामुळे नव्या नियमाचा जुन्या दागिन्यांवर कोणताही परिणाम होणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

HUID नंबर म्हणजे काय आणि यामुळे काय होणार?

आपल्याकडे अधिकृत ओळखीसाठी आधारकार्ड आहे. त्याचप्रमाणे दागिन्यांच्या ओळखीसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) नंबर असतो. हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) नंबर हा सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो. ज्यात काही आकडे आणि अक्षरं असतात, प्रत्येक दागिन्यांवर ज्लेवर्सद्वारे हा नंबर दिला जातो. या नंबरच्या मदतीने तुम्ही दागिन्यांशी संबंधित सर्व माहिती मिळवू शकता. मात्र सर्व ज्वेलर्सना ही माहिती BIS पोर्टलवर अपलोड करावी लागते. मात्र अद्याप अनेक छोटे सोने दुकानकार दागिन्यांवर केवळ हॉलमार्कचा मार्क देतात, पण त्यावर कोणत्याही प्रकारचा सहा अंकी नंबर देत नाहीत.