मंदीच्या सावटामुळे विविध क्षेत्रांवर त्याचा परिणाम होत आहे. गेल्या काही काळात जगातील अनेक मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आता आणखी एक कंपनी Deloitte देखील या यादीत सामील झाली आहे. डेलॉइट ही ४ मोठ्या आर्थिक सल्लागार कंपन्यांपैकी एक आहे, ज्यांनी नोकर कपातीची घोषणा केली आहे. लंडन-मुख्यालय असलेली फर्म डेलॉइटने २०२२ मध्ये ५९.३ अब्ज डॉलर वार्षिक कमाई नोंदवली. डेलॉइटने यूएसमधील सुमारे १,२०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. देशातील कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी हे प्रमाण सुमारे १.४ टक्के आहे. डेलॉइटने त्यांच्या व्यवसायातील सल्लागार बाजूच्या मंदीमुळे नोकर कपातीची घोषणा केली आहे.

Deloitte चे नेमके म्हणणे काय?

“ग्राहकांच्या मागणीमुळे आमच्या यूएस व्यवसायात वाढ होत आहे,” असे डेलॉइटचे एमडी जोनाथन गँडल यांनी ईमेलमध्ये सांगितले. विकास मंदावत असल्याचे सांगण्यास त्यांनी नकार दिला. डेलॉइटच्या वार्षिक पारदर्शकता अहवालानुसार, यूएसमधील कर्मचाऱ्यांची संख्या २०२१ मध्ये ६५ हजारांवरून गेल्या वर्षी ८० हजारांपर्यंत वाढली आहे.

हेही वाचाः IPO Update : ‘या’ आठवड्यात अनेक संधी उपलब्ध होणार, गुंतवणुकीसाठी तयार राहा, २ IPO बाजारात येणार

‘या’ कंपन्यांनीही केली नोकर कपात

Deloitte व्यतिरिक्त KPMG ने फेब्रुवारीमध्ये घोषणा केली की, ते यूएसमधील त्यांच्या २% पेक्षा कमी कर्मचाऱ्यांची कपात करतील. याशिवाय अर्न्स्ट अँड यंगने अमेरिकेतील ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. McKinsey & Co सुमारे २,००० कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची योजना आखत असल्याची माहिती मिळाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचाः मोठी बातमी! आर्सेलर मित्तल महाराष्ट्रात करणार ८० हजार कोटींची गुंतवणूक, कोकणात १ हजार एकर जमीन देण्यास मान्यता