Raj Kapoor Bungalow: दिवंगत अभिनेते राज कपूर यांचा मुंबईतील चेंबूर परिसरात असलेला बंगला आता आलिशान गृहनिर्माण प्रकल्पात रूपांतरित होणार आहे. गोदरेज प्रॉपर्टीजने खरेदी केलेल्या या बंगल्याच्या जागी एक भव्य आलिशान गृहसंकुल बांधले जाणार आहे.

गृहनिर्माण प्रकल्पासाठी किती खर्च येणार?

मनी कंट्रोलमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, गोदरेज समूहाचा रिअल इस्टेट व्यवसाय हाताळणारी गोदरेज प्रॉपर्टीज लवकरच आर के स्टुडिओमध्ये २ लाख चौरस फुटांचे प्रीमियम निवासी संकुल बांधणार आहे. स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, या निवासी संकुलाची किंमत सुमारे ५०० कोटी रुपये असण्याची शक्यता आहे. याबरोबरच कंपनीने हैदराबादच्या रिअल इस्टेट मार्केटमध्येही उतरण्याची योजना आखली आहे. गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये झालेल्या बैठकीत याची घोषणा केली होती.

हेही वाचाः टाटा ग्रुपच्या टीसीएस कंपनीला आठवड्याभरात दुसऱ्यांदा लाखो डॉलर्सचा दंड, नेमकं प्रकरण जाणून घ्या

फेब्रुवारीमध्ये कपूर कुटुंबाकडून गोदरेजने बंगला खरेदी केला होता

राज कपूर यांचा हा बंगला मे २०१९ मध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने खरेदी केला होता. ही जमीन राज कपूर यांच्या वारसांनी खरेदी केली होती. हा परिसर मुंबईतील सर्वात पॉश भागांपैकी एक आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सजवळ हा बंगला आहे. गोदरेज प्रॉपर्टीज देशातील विविध भागात अनेक प्रकारच्या गृहनिर्माण प्रकल्पांवर काम करणार आहे. अशा परिस्थितीत आर के स्टुडिओचा हा प्रीमियम गृहनिर्माण प्रकल्प त्याच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे.

हेही वाचाः गौतम सिंघानिया यांनी अखेर मौन सोडले, रेमंड ग्रुपच्या बोर्ड अन् कर्मचाऱ्यांना लिहिला भावनिक ईमेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकल्प कधी सुरू होणार?

गोदरेज प्रॉपर्टीजचे एमडी आणि सीईओ यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये एका बैठकीत माहिती दिली होती की, राज कपूर यांच्या बंगल्यावर बांधण्यात येणारा गृहनिर्माण प्रकल्प कंपनीच्या मोठ्या आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. याबरोबरच कंपनी लवकरच ४९ गुडगावमध्ये एका प्रोजेक्टवर काम सुरू करणार आहे. राज कपूरचा बंगला आणि गुडगाव प्रकल्पाचे काम आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या तिसऱ्या तिमाहीत सुरू होण्याची शक्यता आहे.