Mahindra SUV New Prices : देशातील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (M&M) त्यांच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने जाहीर केले आहे की, ६ सप्टेंबरपासून ग्राहकांना वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) कपातीचा संपूर्ण लाभ दिला जाणार आहे. यामुळे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कर कपातीअंतर्गत पात्र असलेल्या त्यांच्या गाड्यांच्या किंमतीत १.६ लाख रुपयांपर्यंत कपात करण्यात येणार आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा ही कंपनी फक्त एसयूव्ही (SUV) सेगमेंटमधील गाड्यांचे उत्पादन करते. १५०० सीसीपर्यंत इंजिन क्षमता आणि ४००० मिमीपेक्षा लांबी नसलेल्या डिझेल वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे.
केंद्र सरकारकडून लहान कार आणि ३५० सीसीच्या किंवा त्यापेक्षा कमीच्या दुचांकीवरील जीएसटी हा २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला आहे.
मोठे इंजिन असलेल्या पेट्रोल आणि डिझेल कारनप जवळपास ५० टक्के कर आकारला जात होता, ज्यामध्ये २८ टक्के जीएसटी आणि २२ टक्के भरपाई उपकर (compensation cess) भरावा लागत होता. आता नवीन सुधारणानुसार हा कर कमी करून ४० टक्के जीएसटी करण्यात आला आहे.
महेंद्राच्या कोणत्या कारची किमतीत किती कपात होणार?
बोलेरो/निओ – कर हा ३१% (जीएसटी + सेस) वरून आता १८टक्के इतका झाला आहे. ग्राहकांना यामुळे १.२७ लाख रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे.
XUV3XO (पेट्रोल) – २९ टक्के (जीएसटी + सेस) करावरून आता १८ टक्के इतका झाला आहे. ज्यामुळे ग्राहकांना १.४० लाख रुपयांपर्यंत फायदा मिळणार आहे.
XUV3XO (डिझेल) – ३१ टक्के (जीएसटी + सेस) करावरून तो १८ टक्के करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना गाडीच्या किंमतीत १.५६ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.
THAR 2WD (डिझेल) – ३१ टक्के (जीएसटी + सेस) करावरून तो १८ टक्के करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना गाडीच्या किंमतीत १.३५ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.
THAR 4WD (डिझेल) – ४८ टक्के (जीएसटी + सेस) करावरून तो ४० टक्के करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना गाडीच्या किंमतीत १.०१ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.
स्कॉर्पियो क्लासिक – ४८ टक्के (जीएसटी + सेस) करावरून तो ४० टक्के करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना गाडीच्या किंमतीत १.०१ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.
स्कॉर्पिओ एन – ४८ टक्के (जीएसटी + सेस) करावरून तो ४० टक्के करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना गाडीच्या किंमतीत १.४५ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.
Thar Roxx – ४८ टक्के (जीएसटी + सेस) वरून ४० टक्के करण्यात आला आहे. यामुळे ग्राहकांना १.३३ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळणार आहे.
XUV700 – कर ४८ टक्के (जीएसटी + सेस) वरून ४० टक्के करण्यात आला आहे. . यामुळे ग्राहकांना किंमतीत १.४३ लाख रुपयांपर्यंत लाभ मिळेल.
शुक्रवारी टाटा मोटर्सने अशीच घोषणा केली आहे, जीएसटीचे फायदे त्यांच्या ग्राहकांना दिले जाणार आहेत. या नव्या किंमती २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.