फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याच्या निर्यातीत एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत १९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, आंबा निर्यात १९ टक्क्यांनी वाढून ४७.९८ दशलक्ष डॉलर झाली आहे. भारताने आर्थिक वर्ष २४ च्या पहिल्या पाच महिन्यांत २७,३३०.०२ टन आंब्याची विक्री केली, जी मागील वर्षीच्या याच कालावधीत २२,९६३.७८ टन होती.

कोणत्या देशात किती निर्यात होते?

वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेत सर्वाधिक आंबा निर्यात झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत भारताने अमेरिकेला २०४३.६० टन आंब्याची निर्यात केली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १९ टक्के अधिक आहे. याशिवाय ४३ टन जपानला, १११ टन न्यूझीलंडला, ५८.४२ टन ऑस्ट्रेलियाला, ४.४४ टन दक्षिण आफ्रिकेत गेले.

हेही वाचाः कांद्याच्या भावात ५७ टक्क्यांनी वाढ, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी सरकारने ‘बफर स्टॉक’मधून विक्री वाढवली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच भारताने इराण, मॉरिशस, झेक प्रजासत्ताक आणि नायजेरियासह ४१ देशांना आंब्याची विक्री केली आहे.

हेही वाचाः ३० दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण करा अन्यथा दररोज १०० रुपये दंड, आरबीआयचा इशारा

वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत आंब्याची निर्यात ४७.९८ दशलक्ष डॉलर झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत ४०.३३ दशलक्ष डॉलर निर्यातीपेक्षा १९ टक्के अधिक आहे.