येत्या ५ वर्षांत भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल ही मोदींची गॅरंटी; असा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुनरुच्चार केला आहे. २०१९ मध्ये कामगिरीच्या आधारावर तुम्ही मला पुन्हा एकदा आशीर्वाद दिला आहे. पुढील पाच वर्षे अभूतपूर्व विकासाची आहेत. २०४७ चे स्वप्न साकार करण्याचा सर्वात मोठा सुवर्ण क्षण म्हणजे येणारी पाच वर्षे आहेत. येत्या १५ ऑगस्ट रोजी या लाल किल्ल्यावरून मी तुमच्यासमोर देशाचे यश आणि विकास मांडणार आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधोरेखित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून बोलत होते.

पीएम मोदी म्हणाले, ‘युरियाला परवडणारे बनवण्यासाठी देशाचे सरकार युरियावर १० लाख कोटी रुपयांची सबसिडी देत ​​आहे. मुद्रा योजनेने तरुणांना त्यांच्या व्यवसायासाठी २० लाख कोटी रुपये दिले आहेत. ८ कोटी लोकांनी आपला व्यवसाय सुरू केला आहे. प्रत्येक व्यवसायाने १-२ लोकांना रोजगार दिला आहे. वन रँक वन पेन्शन योजना लष्कराच्या वीरांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदेशीर ठरत आहे. प्रत्येक श्रेणीत भारताचे नशीब बदलण्यासाठी पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा वापरला गेला असल्याचंही त्यांनी सांगितलं.

हेही वाचाः मोठी बातमी! कामगारांच्या आर्थिक मदतीसाठी मोदींची नवी योजना, लाल किल्ल्यावरून पंतप्रधानांची घोषणा

…अन् मोदींनी १० वर्षांचा हिशेब दिला

तिरंग्यासमोर लाल किल्ल्यावरून मी १० वर्षांचा हिशेब देशवासियांना देत असल्याचे मोदी म्हणाले. १० वर्षांपूर्वी भारत सरकारकडून ३० लाख कोटी रुपये राज्यांमध्ये जात होते, गेल्या ९ वर्षांत ते १०० लाख कोटींवर पोहोचले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी पूर्वी भारत सरकारकडून ७० हजार कोटी रुपये दिले जात होते, आज ते ३ लाख कोटींहून अधिक आहे.

हेही वाचाः Money Mantra: यशस्वी गुंतवणूकदार व्हायचेय? मग ‘या’ गोष्टींचं पालन करा अन् बघा..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गरिबांच्या घरासाठी यापूर्वी ९० हजार कोटी रुपये खर्च केले जात होते, आज ४ लाख कोटी रुपये खर्च होत आहेत. सरकारचे रिपोर्ट कार्ड सादर करताना मोदी म्हणाले की, २०१४ मध्ये आम्ही आलो तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत आम्ही १० व्या क्रमांकावर होतो. आज १४० कोटी लोकांच्या प्रयत्नांचे फळ मिळाले आहे, आम्ही पाचव्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. हे लगेच घडले नाही. याआधी देशाला भ्रष्टाचाराच्या राक्षसाने ग्रासले होते, लाखो कोटींचे घोटाळे अर्थव्यवस्थेला बाधित ठरत होते, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला.