रिलायन्स रिटेल व्हेंचर्स (RRVL)ची FMCG कंपनी रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (RCPL) ने लोटस चॉकलेट कंपनी लिमिटेडमधील ५१ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. Reliance Consumer Products Limited (RCPL) ने Lotus Chocolate Company Limited मधील भागभांडवल विकत घेण्याची प्रक्रिया ७४ कोटी रुपयांना पूर्ण केली आहे. लोटस चॉकलेटच्या नॉन क्युम्युलेटिव्ह रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्ससाठी कंपनीने २५ कोटी रुपये दिलेत. RCPL ने लोटस कंपनीचे संपूर्ण नियंत्रण आपल्या ताब्यात घेतले आहे.

इक्विटी शेअर्सही विकत घेतले

RCPL ने SEBI टेकओव्हर रेग्युलेशन अंतर्गत केलेल्या खुल्या ऑफरनुसार इक्विटी शेअर्सचे अधिग्रहणदेखील पूर्ण केले आहे. RCPL ने २४ मे २०२३ पासून कंपनीचे संपूर्ण नियंत्रण ताब्यात घेतले आहे. एका निवेदनानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या FMCG शाखेने गुंतवलेले भागभांडवल संपूर्ण औद्योगिक आणि ग्राहक बाजार स्पेक्ट्रममधील मिठाई, कोको, चॉकलेट डेरिव्हेटिव्ह आणि संबंधित उत्पादनांच्या सर्वसमावेशक उत्पादकामध्ये लोटसच्या वाढीस आणि विस्तारास मदत करणार आहे.

हेही वाचाः 75 Rs Coin : संसद भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी मोदींच्या हस्ते ७५ रुपयांचे ‘स्पेशल’ नाणंही प्रसिद्ध होणार, जाणून घ्या खासियत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कंपनीला नेमका फायदा काय?

अहवालानुसार, चॉकलेट कंपनीने मार्च २०२२ ला संपलेल्या वर्षात ६ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीने ८७ कोटी रुपयांची विक्री केली आहे. लोटस चॉकलेट्सचे अधिग्रहण हा रिलायन्स रिटेलच्या वेगाने वाढणाऱ्या FMCG व्यवसायाचा विस्तार करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे. कंपनीने नुकतेच यामध्ये पाऊल टाकले आहे. RRVL ही मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे आणि RIL समूहाच्या अंतर्गत सर्व रिटेल व्यवसायांसाठी होल्डिंग कंपनी आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेत RIL चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी ग्रुपच्या वेगाने वाढणाऱ्या FMCG क्षेत्रात प्रवेश करण्याच्या योजनेची घोषणा केली होती.

हेही वाचाः मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय; खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही आता ‘यावर’ मिळणार २५ लाखांपर्यंत कर सूट