लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : आशियाई बाजारातील संमिश्र संकेत आणि त्या परिणामी निर्देशांकात सर्वाधिक योगदान राखणाऱ्या एचडीएफसी बँक, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये झालेल्या खरेदीने मंगळवारी प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी वधारले.

bse sensex rise 599 points to settle at 73088
तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड
stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार

मंगळवारच्या अस्थिर सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १६५.३२ अंशांनी वधारून, ७३,६६७.९६ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ५०१.५२ अंशांची कमाई करत ७४,००४.१६ ही सत्रातील उच्चांकी पातळी गाठली होती. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३.०५ अंशांची किरकोळ वाढ झाली आणि तो २२,३३५.७० पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>>स्टेट बँक अध्यक्ष दिनेश खारा यांच्या राजीनाम्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयाकडून फटकारले गेल्यांनंतर बँक कर्मचारी संघटनेचा आक्रमक पवित्रा

सोमवारच्या सत्रातील नफावसुलीमुळे मंगळवारच्या सत्रात देशांतर्गत बाजारात निर्देशांक एका ठराविक पातळीमध्ये व्यवहार करत होते. मिड आणि स्मॉल-कॅप समभागांच्या बुडबुडेसदृश चढलेल्या मूल्यांकनाच्या ‘सेबी’ अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे, या समभागांवर विक्रीचा ताण दिसून आला. जागतिक पातळीवर गुंतवणूकदार अमेरिकेतील महागाई दराच्या प्रतीक्षेत असून त्यावरून ‘फेड’च्या व्याजदराबाबत अंदाज बांधला जाणार आहे. याचबरोबर भारताच्या चलनवाढीचे आकडे जाहीर होणार असून, महागाई दर मागील महिन्याशी सुसंगत राहण्याची अपेक्षा आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

हेही वाचा >>>बाजारातील सध्याचे उधाण अतर्क्य असल्याचा ‘सेबी’ अध्यक्ष माधवी पुरी बूच यांचा इशारा, स्मॉल, मिड-कॅपमध्ये बुडबुड्याची स्थिती

सेन्सेक्समध्ये एचडीएफसी बँकेचा समभाग २ टक्क्यांहून अधिक वधारला. त्यापाठोपाठ टीसीएस, मारुती, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेल या कंपन्यांचे समभाग तेजीत होते. दुसरीकडे स्टेट बँक, जेएसडब्ल्यू स्टील, आयटीसी, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट आणि नेस्लेच्या समभागात घसरण झाली. सोमवारच्या सत्रात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ४,२१२.७६ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खरेदी केली.

स्मॉल व मिडकॅपची आपटी

बाजार प्रवाहाच्या विपरीत स्मॉल व मिड कॅप समभागांमध्ये झालेल्या जोरदार विक्रीचे प्रतिबिंब, या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निर्देशांकांतही उमटले. परिणामी एकीकडे सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ दिसत असताना, बीएसई स्मॉल कॅप तसेच बीएसई मिड कॅप निर्देशांक अनुक्रमे २.११ टक्के आणि १.३१ टक्के असे दणदणीत आपटले.

सेन्सेक्स ७३,६६७.९६ १६५.३२ (०.२२%)

निफ्टी २२,३३५.७० ३.०५ (०.०१%)

डॉलर ८२.७८ ३ पैसे

तेल ८२.९२ ०.८६