जर भारतीय आयटी क्षेत्राबद्दल बोलायचे झाल्यास नारायण मूर्ती यांचं नाव पहिले घेतले जाते. इन्फोसिस सारखी मोठी कंपनी त्यांनी आपल्या संघर्षातून स्थापन केली. नागावरा रामाराव नारायण मूर्ती हे बिझनेस टायकून आहेत. नारायण मूर्ती हे इन्फोसिसच्या सात सह संस्थापकांपैकी एक आहेत. त्यांनी इन्फोसिसचे अध्यक्षपद भूषवले आहे. याशिवाय त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), अध्यक्ष आणि मुख्य संरक्षक ही पदेही भूषवली आहेत.

नारायण मूर्ती यांचा जन्म २० ऑगस्ट १९४६ रोजी म्हैसूर (कर्नाटक) येथे झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात वाढलेल्या आणि विविध अडचणींवर मात करूनही त्यांनी लहान असतानाच शैक्षणिक क्षमता दाखवली. म्हैसूर विद्यापीठातून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केल्यानंतर नारायण मूर्ती यांनी त्यांच्या पदव्युत्तर पदवीसाठी प्रसिद्ध आयआयटी कानपूरमध्ये प्रवेश घेतला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आयआयएम अहमदाबाद येथे रिसर्च असोसिएट म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यानंतर १९८१ मध्ये त्यांनी पत्नी सुधा मूर्ती यांच्याकडून १० हजारांचं कर्ज घेतले आणि इतर ६ सॉफ्टवेअर तज्ज्ञांसह इन्फोसिसची स्थापना केली.

हेही वाचाः Money Mantra : HDFC, ICICI, SBI, Canara, BoB आणि पोस्ट ऑफिस यातील कोणती बँक FD वर देतेय सर्वाधिक व्याज? जाणून घ्या

नारायण मूर्ती यांचे लग्न इन्फोसिस फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांच्याशी झाले आहे. त्यांनी चार वर्षे एकमेकांना डेट केले आणि १० फेब्रुवारी १९७८ रोजी लग्न केले. नारायण मूर्ती खूप कमी पैसे कमवत असल्याने सुधाच्या वडिलांनी सुरुवातीला नारायण मूर्तीच्या लग्नाला विरोध केला. नारायण मूर्ती यांनी १९७७ च्या उत्तरार्धात पटनी कॉम्प्युटर्सचे व्यवस्थापक म्हणून काम करायला सुरुवात केली, तेव्हा सुधाच्या वडिलांनी लग्नाला मंजुरी दिली. सुधा यांनी १९८१ मध्ये इन्फोसिस सुरू करण्यासाठी नारायण मूर्ती यांना १० हजार रुपयांचे कर्जही दिले. विशेष म्हणजे त्यांच्याकडे एका डब्यात १० हजार २५० रुपये होते, त्यातील १० हजार रुपये त्यांनी देऊन आपत्कालीन परिस्थितीसाठी त्या काळात २५० रुपये राखून ठेवले. खरं तर सुधा मूर्तींसुद्धा हा प्रसंग अनेकदा सोशल मीडियातील व्हिडीओंमधून जाहीरपणे सांगितला आहे.

हेही वाचाः एतिहाद एअरवेजकडून ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीची नियुक्ती, कंपनीचा भारतीय बाजारपेठेत पकड मजबूत करण्याचा प्रयत्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोर्ब्सच्या मते, नारायण मूर्ती यांची एकूण संपत्ती आता ४.४ अब्ज डॉलर आहे. फॉर्च्युन मासिकाने नारायण मूर्ती यांचा १२ महान उद्योजकांमध्ये समावेश दिला आहे. भारतातील आउटसोर्सिंगमधील योगदानाबद्दल त्यांना टाइम मासिक आणि CNBC द्वारे ‘भारतीय आयटी क्षेत्राचे जनक’ म्हणून संबोधले गेले आहे.