मुंबई : आठवड्याअखेरीस समाप्त होणारे विक्रम संवत्सर २०७९ मध्ये भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने विक्रमी खेळी केली. शुक्रवारच्या बाजारातील व्यवहारांनी या सवंत्सराला निरोप दिला, ज्यामध्ये निफ्टी आणि सेन्सेक्सने प्रत्येकी ९ टक्के वाढ नोंदवली. तर निफ्टी मिडकॅप १०० आणि स्मॉल-कॅप १०० निर्देशांकांनी अनुक्रमे ३० टक्के आणि ३६ टक्क्यांचा परतावा मिळवून दिला. ही कामगिरी पाहता बाजार सहभागी हे पुढील दिवाळीपर्यंत नवीन सवंत्सरात आणखी नफ्यासाठी बाजी लावणे क्रमप्राप्त आहे. या अनुषंगाने ‘लोकसत्ता’ने विविध दलाली फंडांच्या २० कंपन्यांच्या समभागांची शिफारशींची यादी प्रस्तुत केली आहे. संवत्सर २०८० मध्ये चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. यामध्ये लार्ज-कॅप, मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप श्रेणीतील कंपन्यांचा समावेश आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस
कंपनी बाजारभाव लक्ष्य संभाव्य वाढ (टक्क्यांमध्ये)
स्टेट बँक ५७९.५० ७०० २२
टायटन ३,२५६.३५ ३,९०० १९
महिंद्र अँड महिंद्र १,५२४.१० १,७७० १९
सिप्ला १,२४०.१० १,४५० २१
रेमंड १,८८९.३० २,६०० ३८
रेलिगेअर ब्रोकिंग
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ३,३३३.४५ ४,०८९ २०.९
आयटीसी ४३६.५५ ५३५ २२.४
ॲक्सिस बँक १,०२९.२० १,१६७ १४.२
मारुती सुझुकी १०,३८८.८० १२,७१४ २३.२
एसबीआय लाइफ इन्शुरन्स १,३५५.४० १,६४४ २२.२
आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकिंग
लार्सन अँड टुब्रो ३,०३३.२५ ३,५६० २२
कोरोमंडल इंटरनॅशनल १,०९७.५० १,३३० २६
स्टेट बँक ५७९.५० ७२५ २७
भारत डायनॅमिक्स १,०५३.२० १,२६० २६
सेंच्युरी प्लायबोर्ड ६३५.७५ ७५० २४
येस सिक्युरिटीज
नजारा टेक्नॉलॉजी (नझारा इन) ८२० ८८७ ७
संवर्धन मदरसन ९० ११४ २७
कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस २,३७६ ३,००० २६
ईमुद्रा लिमिटेड ४५३ ५५६ २२.७
एबीबी इंडिया लिमिटेड ४,३११ ५,२०० २१
एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेस
वेस्टलाइफ फूडवर्ल्ड ८११ १,०४० २८
ब्रिटानिया इंडस्ट्रीज ४,६७१ ५,२५० १२
डाबर इंडिया ५३९ ६५० २१
इमामी ५११ ६२५ २२
गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स १,०१६ १,२०० १८