संत्रा हे विदर्भातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पीक असून, संत्र्यावर नागपूरबरोबरच देशात विविध संशोधन संस्था नवनवीन संशोधन करीत आहेत. देशातील संत्रा, मोसंबी आणि लिंबू उत्पादकांची मुख्य समस्या ही उत्पादनाची गुणवत्ता असून, शेतकऱ्यांना रोगविरहित, उच्च दर्जाची भरघोस उत्पादन क्षमता असणारी लिंबूवर्गीय फळांची रोपे मिळावी, यासाठी संशोधन संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आयोजित ‘एशियन सीट्रस काँग्रेस २०२३’ या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी नागपूरमध्ये केले.

एशियन सिट्रस काँग्रेस परिषद २०२३ ही आशियातील लिंबूवर्गीय उद्योगाच्या प्रगतीसाठी एक समर्पित आणि अद्वितीय कार्यक्रम आखणार असून लिंबूवर्गीय क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र आणणारी परिषद असून, जगातील १५ देशांतून आणि भारतातील २० राज्यांतून 300 पेक्षा जास्त प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झालेले आहेत. जगभरातील संशोधक, शास्त्रज्ञ, तज्ज्ञ त्यांचे ज्ञान, अनुभव आणि नवकल्पना एकाच ठिकाणी सामायिक करणे तसेच लिंबूवर्गीय उद्योगाचा कायापालट करण्यासाठी सहभागी प्रतिनिधींमध्ये नवीन संबंध, सहयोग आणि नेटवर्किंग स्थापित करणे हे परिषदेचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचाः Government Jobs: ५१ हजारांहून अधिक तरुणांना मिळाल्या सरकारी नोकऱ्या, पंतप्रधान मोदींच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप

आशियाई सिट्रस काँग्रेस २०२३ ही ३ दिवसीय परिषद २८ ते ३० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नागपूर, येथे होत असून “कृषी-आर्थिक समृद्धीसाठी अ‍ॅडव्हान्सिंग सिट्रीकल्चर” ही या परिषदेची संकल्पना आहे. एशिया-पॅसिफिक असोसिएशन ऑफ एग्रीकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूशन्स, बँकॉक, थायलंड, कोरियन सोसायटी फॉर सिट्रस आणि सबट्रॉपिकल क्लायमेट फ्रूट्स ,जेजू सिटी, दक्षिण कोरिया यांचासुद्धा या परिषदेत सहभाग आहे.

हेही वाचाः ‘पंतप्रधान मोदी रोज १४-१६ तास काम करतात;’ उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्याकडून नारायण मूर्तींच्या विधानाचं समर्थन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील कृषी संशोधन संस्थांनी यावर्षी रोगविरहित उच्च दर्जाची अशी २ कोटी लिंबूवर्गीय रोपे शेतकऱ्यांना द्यावी, याकरिता देशातील संशोधन संस्थांनी खासगी नर्सरींबरोबर भागीदारी करून ही मागणी पूर्ण करावी, असे गडकरींनी सांगितले. जगातील तिसरी अर्थव्यवस्था मोठी होण्यासाठी आणि ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची क्षमता पूर्ण करण्यासाठी शेतीत आमूलाग्र बदल होणे गरजेचे असून, भारतातील कृषीदर हा १२ टक्क्यांपेक्षा जास्त वाढायला हवा. त्याचप्रमाणे वेळोवेळी शेतकऱ्यांना लिंबूवर्गीय फळांच्या बाबतीत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी अचूक धोरणे, योग्य मार्गदर्शन, योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे गडकरींनी नमूद केले.