देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी लवकरच विमा विक्री सुरू करणार आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) त्यांनी घोषणा केली की, लवकरच त्यांची कंपनी Jio Financial Services विमा क्षेत्रात प्रवेश करणार आहे. या कंपनीला अलीकडेच रिलायन्स इंडस्ट्रीजपासून वेगळे करण्यात आले आणि शेअर बाजारात तिला लिस्ट करण्यात आले. मुकेश अंबानी यांनी सांगितले की, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस केवळ आयुर्विमा विकणार नाही, तर सामान्य विमा आणि आरोग्य विम्याशी संबंधित उत्पादनेही विकणार आहेत.

हेही वाचाः चांद्रयान ३ चा उल्लेख करत मुकेश अंबानी म्हणाले, ”नव्या भारताला रोखणे अशक्य…”

एलआयसीशी स्पर्धा करण्याची तयारी

रिलायन्स इंडस्ट्रीज ही सध्या देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. तसेच Jio Financial Services चा देशातील टॉप ५ वित्तीय कंपन्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत कंपनी विमा मार्केट लीडर लाइफ इन्शुरन्स ऑफ इंडिया (LIC) तसेच HDFC Life, ICICI प्रुडेन्शियल इत्यादी इतर कंपन्यांशी स्पर्धा करण्याची तयारी करीत आहे. भविष्याचा विचार करून मुकेश अंबानींनी हा व्यवसाय डिजिटली वाढवण्याबाबत बोलले आहेत. बाजारात स्पर्धा निर्माण करण्यासाठी जागतिक खेळाडूंशी भागीदारी करण्याची शक्यता देखील व्यक्त केली गेली आहे. ही कंपनी डेटा अॅनालिटिक्स वापरून ग्राहकांसाठी संकल्पना आधारित विमा उत्पादने विकसित करेल, जी ग्राहकांच्या फायद्यांना लक्षात घेऊन तयार केली जातील, असंही त्यांनी सांगितले.

हेही वाचाः गणेश चतुर्थीला जिओ एअर फायबर लाँच करणार; मुकेश अंबानींची घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Jio AirFiber लाँच होणार

एजीएममध्येच मुकेश अंबानी यांनी जिओ एअर फायबर सेवा सुरू करण्याची घोषणा केली. ते म्हणाले की, जिओ एअर फायबरची सेवा देशात १९ सप्टेंबरपासून म्हणजेच गणेश चतुर्थीपासून सुरू होणार आहे. त्याच्या मदतीने लोकांना घरापासून ऑफिसपर्यंत सर्व ठिकाणी हायस्पीड इंटरनेटची सुविधा मिळेल. ही एक वायरलेस सेवा असेल, जी हाय-स्पीड इंटरनेटसाठी घरांमध्ये केबल टाकण्याचा आणि लाईन टाकण्याचा त्रास दूर करेल.