मुंबई : आघाडीचे रोखे आगार असलेल्या नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या (एनएसडीएल) समभागाने १० टक्के अधिमूल्यासह बाजारात ८८० रुपयांवर पदार्पण केले. प्रारंभिक समभाग विक्रीतून गुंतवणूकदारांना ८०० रुपयांना प्राप्त झालेल्या समभागाने १७ टक्के वाढीसह ९३६ रुपयांवर बुधवारी विश्राम घेतला. या बाजार भावानुसार, कंपनीचे २३,४१३ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.
राष्ट्रीय शेअर बाजारात ‘एनएसडीएल’च्या समभाग ८८० रुपयांवरून सुरुवात करीत, व्यवहारात ९४३.८५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर झेप घेतली होती. तर ८०० रुपये हा त्याचा दिवसातील तळ राहिला.
‘एनएसडीएल’ने आयपीओच्या माध्यमातून ४,०११ कोटींची निधी उभारणी केली आहे. कंपनीच्या आयपीओला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला होता. कंपनीच्या आयपीओसाठी ४१ पट अधिक भरणा झाला होता. कंपनीने आयपीओसाठी ७६०-८०० रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता.