Pakistan Hikes Petrol-Diesel Prices: भारताचा शेजारी असलेला देश पाकिस्तानची अर्थव्यवस्था सध्या खूपच वेगळ्या वळणावर आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड महागड्या आहेत. महागाईने रेकॉर्ड तोडला आहे. या महागाईमुळे गरीबच नव्हे तर मध्यमवर्गातील प्रत्येक नागरिकाला त्रास होत आहे. आता पाकिस्तानच्या काळजीवाहू सरकारने नागरिकांना खूप मोठा धक्का दिला आहे. पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. या वाढीमुळे किमतीनी नवीन विक्रमी पातळी गाठली असून यामुळे देशावर मोठे आर्थिक संकट आले आहे.

किती झाली दरवाढ?

पाकिस्तान सरकारने पेट्रोलच्या दरात २६ रुपये २ पैशांनी वाढ केली आहे, तर डिझेलच्या किमतीत १७ रुपये ३४ पैशांनी वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोलची किंमत आता ३३१ रुपये ३८ पैसे इतकी झाली आहे. तर डिझेल ३२९.१८ रुपये प्रति लिटर झाले आहे. ही वाढ १६ सप्टेंबरपासून लागू करण्यात आली आहे. काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक काकर यांची मंजुरी मिळाल्यानंतर अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी रात्री पेट्रोलच्या आणि डिझेलच्या दरात वाढ करण्याचा आदेश जारी केला आहे. यानंतर पेट्रोल आणि ‘हाय-स्पीड’ डिझेलच्या (एचएसडी) किमती प्रतिलिटर ३३० रुपयांनी वाढल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानी जनतेचे पार कंबरडे मोडले आहे.

(हे ही वाचा : फिचकडून ६.३ टक्के वाढीचा अंदाज कायम, वर्षा अखेरीस महागाई वाढण्याची शक्यता )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापूर्वीही झाली दरवाढ

पाकिस्तानच्या जनतेचे जगणं अवघड होऊन बसलं आहे. ऑगस्टमध्ये महागाई २७.४ टक्क्यांहून अधिक वाढल्यानंतर इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. यापूर्वी १ सप्टेंबरलाही काळजीवाहू सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर १४ रुपयांची वाढ केली होती. शेजारील देशात पंधरवड्यात या पेट्रोलियम पदार्थांच्या किमती दोनदा वाढल्याने तेथील लोकांवर आर्थिक बोजा वाढणार आहे.