मुंबई: आधुनिक धाटणीच्या वजनाने हलक्या पण चित्ताकर्षक रचनेतील दागिन्यांची बी २ बी स्वरूपात निर्माती आणि निर्यातदार सराफ पेढी पुष्पा ज्वेलर्स लिमिटेडने येत्या सोमवार, ३० जून २०२५ पासून सुरू होणाऱ्या प्रारंभिक समभाग विक्रीतून (आयपीओ) ९८.६५ कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. ‘एनएसई इमर्ज’ बाजारमंचावर समभागांच्या सूचिबद्धतेसाठी असलेली ही विक्री २ जुलै २०२५ पर्यंत सुरू राहिल. गुंतवणूकदारांना प्रत्येकी १४३ रुपये ते १४७ रुपये किमतीदरम्यान किमान १,००० समभागांसाठी बोली लावणारा अर्ज करता येईल.

मागील १६ वर्षांपासून कार्यरत पुष्पा ज्वेलर्सने संघटित क्षेत्रातील सराफांना दागिन्यांची पुरवठादार महणून संपूर्ण भारतात मजबूत उपस्थिती निर्माण करण्यासह, निर्यात व्यवसायाद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील विस्तार साधला आहे. गत पाच वर्षात सरासरी ६० टक्क्यांच्या चक्रवाढ वाढीसह कंपनीची उलाढाल २०२४-२५ अखेर २८१.०६ कोटींवर, तर निव्वळ नफा २२.२८ कोटी रुपयांवर गेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲफिनिटी ग्लोबल कॅपिटल मार्केट ही कंपनी भागविक्रीचे व्यवस्थापन पाहणार आहे, तर कॅमिओ कॉर्पोरेट सर्व्हिसेस ही निबंधक आहे. कंपनीची किरकोळ विक्रीत प्रवेशाची योजना असून, ‘आयपीओ’तून उभ्या राहणाऱ्या निधीचा विनियोग नवीन शोरूम उघडण्यासाठी आणि खळेत भांडवल म्हणून केला जाणार आहे.