मुंबई: चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दराचा अंदाज रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ४ टक्क्यांवरून ३.७ टक्क्यांपर्यंत कमी केला. जागतिक पातळीवर वस्तू आणि सेवांच्या किमती नरमल्याने महागाई सौम्य राहण्याची अपेक्षा आहे. सरलेल्या एप्रिलमध्ये महागाई दर ३.१६ टक्के असा पाच वर्षांच्या तळ गाठणारा नोंदवला गेला आहे.

एकीकडे महागाई कमी होण्याबाबात अनुकूल अंदाज वर्तवले असले तरी, हवामानाशी संबंधित अनिश्चितता आणि जागतिक वस्तूंच्या किमतींवर त्यांच्या परिणामासह वाढत्या दरांशी संबंधित घडामोडींवर रिझर्व्ह बँक लक्ष ठेवून आहे. आगामी जून आणि सप्टेंबर तिमाहीमध्ये महागाई दर अनुक्रमे २.९ टक्के आणि ३.४ टक्के राहील, तर डिसेंबर तिमाहीसाठी महागाई दर ३.९ टक्के आणि मार्च तिमाहीसाठी ४.४ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. आगामी २०२५-२६ आर्थिक वर्षात तो किंचित वाढून सरासरी ४.५ टक्के राहण्याचा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे.

सामान्य मान्सून गृहीत धरल्यास, २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी ग्राहक किंमत निर्देशांकावर (सीपीआय) आधारित महागाई ३.७ टक्क्यांपर्यंत खाली येण्याची चिन्हे आहेत. जून आणि सप्टेंबर तिमाहीमध्ये महागाई दर अनुक्रमे २.९ टक्के आणि ३.४ टक्के राहील. तर डिसेंबर तिमाहीसाठी महागाई ३.९ टक्के आणि मार्च तिमाहीसाठी ४.४ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एप्रिलमध्ये किरकोळ महागाई ३.१६ टक्क्यांच्या जवळपास ६ वर्षांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. रब्बी पीक हंगामात गव्हाचे विक्रमी उत्पादन आणि प्रमुख डाळींचे वाढलेल्या उत्पादनामुळे प्रमुख अन्नपदार्थांचा पुरेसा पुरवठा सुनिश्चित होईल. पुढे जाऊन, सामान्यपेक्षा अधिक मान्सूनची शक्यता आणि खरीप पिकांच्या संभाव्यतेसाठी चांगले संकेत आहेत. हे गृहीत धरल्यास महागाई रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्यानुरूप राहील. महागाईस कारणीभूत ठरणार आणि आयात बिलात सर्वाधिक वाटा असणाऱ्या खनिज तेलासह प्रमुख वस्तूंच्या किमतींमध्ये घट होण्याचे संकेत मिळत आहेत. एप्रिल २०२५ पर्यंत सलग तीन महिने किरकोळ महागाई दर ४ टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा कमी राहिला आहे.