गेल्या वर्षी २ हजाराच्या नोटा वितरणातून काढल्यानंतर आरबीआयनं आपल्या १९ शाखांवर या नोटा बदलून मिळण्याची सोय उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार, त्या त्या शाखांवर जाऊन या नोटा ठराविक रकमेपर्यंत बदलून घेता येऊ शकतात. मात्र, येत्या १ एप्रिल रोजी आरबीआयच्या १९ शाखांमध्ये या नोटा बदलून मिळणार नाहीत, असं आरबीआयकडून जाहीर करण्यात आलं आहे. यासंदर्भात आरबीआयकडून माहिती प्रसारित करण्यात आली आहे.

जवळपास पाच वर्षांपू्र्वी २ हजाराच्या नोटा बाजारात दाखल झाल्या. त्यानंतर गेल्या वर्षी मे महिन्यात आरबीआयनं रीतसर अधिसूचना काढून २ हजाराच्या नोटा वितरणातून काढल्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे या सर्व घडामोडींवर विरोधकांकडून टीकाही करण्यात आली होती. मात्र, वितरणातून नोटा काढल्या असल्या, तरी त्या बाजारातील व्यवहारांमध्ये वैध चलन म्हणून मात्र कायम राहतील, असं आरबीआयनं स्पष्ट केलं. त्यानंतर या नोटा बदलून मिळण्याची सोय RBI नं उपलब्ध करून दिली होती.

man lose over rs 20 lakhs in fake stock market trading scams
शेअर ट्रेडींगमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेबावीस लाखांची फसवणूक
New Tax System, New Tax System Criteria, tax deduction, tax pay, Home Loan tax deduction, Tax Regime, New Tax System, finance article, tax article, marathi finance articles,
करावे कर समाधान : नवीन करप्रणाली निवडण्याचे निकष
Accused in Yes Bank fraud, Rs 400 Crore Fraud, Arrested After Three Years, kerala airpot arrest, ajit menon, fraud yes bank, yes bank fraud accussed arrested, fraud in yes bank, marathi news, fraud news,
येस बँकेचं ४०० कोटींचं फसवणूक प्रकरण : ब्रिटनमध्ये राहणाऱ्या आरोपीला अटक
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश

रिझर्व्ह बँकेने कार्ड नेटवर्कवर निर्बंध का घातले? तुमच्यावर काय परिणाम होणार? वाचा सविस्तर…

येत्या १ एप्रिल रोजी बँकेमध्ये खात्यांचा वार्षिक आढावा असल्यामुळे या दिवशी नोटा बदलून देण्याचं काम पूर्णपणे बंद असेल, असं आरबीआयनं स्पष्ट केलं आहे. २ एप्रिल रोजी पुन्हा ही सुविधा सुरू होईल, असंही बँकेकडून सांगण्यात आलं आहे. अहमदाबाद, बंगळुरू, बेलापूर, भोपळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पटना आणि तिरुअनंतपुरम या ठिकाणी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

२०१९मध्येच छपाई झाली बंद

दरम्यान, आरबीआयनं २०१९ सालीच २ हजाराच्या नोटांची छपाई बंद केली आहे. ५०० च्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात आल्यानंतर २ हजाराच्या नोटांसंदर्भात हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी या नोटा बदलून देण्याचं काम आरबीआयनं सुरू केलं. १ मार्च २०२४ पर्यंत आरबीआयकडे परत आलेल्या २ हजारांच्या नोटांचं प्रमाण जवळपास ९७.६२ टक्के इतकं आहे. त्यामुळे आता बाजारात साधारणपणे एकूण छापण्यात आलेल्या नोटांपैकी अवघ्या २ टक्के नोटाच वितरणात आहेत.