IT Sector Workforce: गेल्या एका वर्षात कोरोना महामारीचा प्रभाव कमी झाल्यामुळे जगभरातील अनेक मोठ्या अर्थव्यवस्था आर्थिक मंदीतून जात आहेत. त्याचा सर्वाधिक फटका आयटी क्षेत्रातील कंपन्यांना बसला आहे. जगाबरोबरच भारतावरही त्याचा परिणाम दिसून येत आहे. भारतातील १० आघाडीच्या आयटी कंपन्या, ज्यात २० लाखांहून अधिक अभियंते कार्यरत आहेत, त्यांच्या कर्मचार्‍यांमध्ये घट होत आहे. लाइव्ह मिंटमध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्टनुसार, जानेवारी ते सप्टेंबर २०२३ या नऊ महिन्यांत सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या संख्येत घट झाली आहे.

प्रमुख भारतीय आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी

आयटी तज्ज्ञांच्या मते, सप्टेंबर ते मार्च हा साधारणपणे आयटी क्षेत्रात कमी कामाचा कालावधी असतो, परंतु जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत कमी नोकऱ्या हे भारतीय आयटी क्षेत्रात मंदीचे संकेत देत आहेत. मिंट या इंग्रजी न्यूज पोर्टलच्या वृत्तानुसार, देशातील १० आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या आकडेवारीवरून त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचाः ”नारायण मूर्ती आठवड्यातून ८० ते ९० तास काम करतात”, पत्नी सुधा मूर्तींनी स्पष्टच सांगितलं

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस इत्यादी मोठ्या आयटी कंपन्यांसह अनेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला देशातील आघाडीच्या १० आयटी कंपन्या २१.१० लाख कर्मचार्‍यांना रोजगार देत होत्या, मात्र सप्टेंबरपर्यंत ते २०.६० लाखांवर आले आहे.

हेही वाचाः ‘गुजरातमधील डायमंड बोर्समुळे महाराष्ट्रावर विपरीत परिणाम होणार नाही’; एमआयडीसीचा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२५ वर्षांत प्रथमच कामगारांची संख्या घटली

गेल्या २५ वर्षात पहिल्यांदाच आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. इन्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड इत्यादी आयटी कंपन्यांमध्ये गेल्या ९ महिन्यांत ५१,७४४ नोकऱ्या कमी झाल्यात. तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि युरोपमधील मंदीमुळे भारतीय आयटी क्षेत्रावरही विपरीत परिणाम झाला आहे.