नवी दिल्ली : देशातील बाजारमूल्यानुसार सर्वांत मोठी कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत १७ हजार ३९४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीला १३ हजार ६५६ कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्या तुलनेत आता नफ्यात २७ टक्के वाढ झाली आहे.

कंपनीचा एकूण महसुल २ लाख ३४ हजार कोटी रुपयांवर स्थिर राहिला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाचा अनेक क्षेत्रात व्यवसाय विस्तार आहे. त्यात ऊर्जा, पेट्रोकेमिकल्स, रिटेल आणि टेलिकम्युनिकेशन्स या क्षेत्रांचा समावेश आहे. याचवेळी समूहातील रिलायन्स रिटेल कंपनीने दुसऱ्या तिमाहीत २ हजार ७९० कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत त्यात २१ टक्के वाढ झाली आहे.

infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
Tejasvi Surya files nominations papers
पाच वर्षांत संपत्ती १३ लाखांवरून ४ कोटी; कोण आहेत भाजपाचे तेजस्वी सूर्या?

हेही वाचा : प्राप्तिकर विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत नऊ वर्षांत ९० टक्के वाढ; वर्ष २०२१-२२ मध्ये संख्या ६.३७ कोटींवर

कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले की, समूहातील सर्वच व्यवसायांकडून भक्कम कार्यचालन आणि वित्तीय योगदान झाल्याने रिलायन्स आणखी एका तिमाहीत मोठी वाढ नोंदविली आहे. रिलायन्स रिटेल ऑफलाइन आणि ऑनलाइन विस्तार वाढवत आहे. आमच्या रिटेल व्यवसायातील विविधता आणि ताकदीमुळे आम्ही सातत्याने चांगली कामगिरी करीत आहोत.

समुहावरील कर्ज घटले

रिलायन्स समूहावर विद्यमान आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत ३.१८ लाख कोटींचे कर्ज होते. ते दुसऱ्या तिमाहीअखेर २.९५ लाख कोटींपर्यंत खाली आले आहे. सध्या कंपनीकडे रोख आणि रोख समतुल्य १.७७ लाख कोटी रुपयांची गंगाजळी आहे.

हेही वाचा : अंबानींच्या उत्तराधिकाऱ्यांचे संचालक मंडळात निवडीवर भागधारकांचे शिक्कामोर्तब; ईशा, आकाश आणि अनंत यांच्या बाजूने बहुमताने कौल

जिओच्या नफ्यात १२ टक्के वाढ

रिलायन्स जिओ इन्फोकॉम कंपनीने सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत ५ हजार ५८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदविला आहे. मागील आर्थिक वर्षातील याच तिमाहीत कंपनीला ४ हजार ५१८ कोटी रुपयांचा नफा झाला होता. त्या तुलनेत आता कंपनीच्या नफ्यात १२ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. कंपनीच्या महसुलात ९.८ टक्के वाढ होऊन तो २४ हजार ७५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.