देशातील फंड घराण्यांपैकी सर्वांत मोठ्या एसबीआय म्युच्युअल फंडाने व्यवस्थापनाखालील मालमत्तेचा (एएमयू) ८ लाख कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत ९० हजार कोटी रुपयांची भर पडली आहे. एसबीआय म्युच्युअल फंडाने पुढील वर्ष ते दीड वर्षांच्या कालावधीत व्यवस्थापनाखालील मालमत्ता १० लाख कोटींवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

याबाबत कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक डी.पी.सिंग म्हणाले की, पहिल्या तिमाहीत आमच्या व्यवस्थापनाखालील मालत्तेत ९० हजार कोटींची भर पडली आहे. आधी व्यवस्थापनाखालील मालमत्ता ७.१० लाख कोटी रुपये होती. ती वाढून ८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा टप्पा आम्ही कालच (ता.३) गाठला. आमचे १० लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट असून, ते आम्ही वर्ष ते दीड वर्षाच्या कालावधीत गाठू.

हेही वाचाः अनिल अंबानींपाठोपाठ आता टीना अंबानींचीही ईडीकडून चौकशी

एसबीआय म्युच्युअल फंडांचा ८ लाख कोटींच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेसह म्युच्युअल फंड बाजारपेठेतील हिस्सा १८ टक्क्यांवर पोहोचला आहे. कंपनीच्या एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेपैकी ५.५ लाख कोटी रुपये समभागांमध्ये आणि उरलेले डेटमध्ये आहेत. दरमहा २ हजार २०० कोटींच्या एसआयपीचा ओघ सुरू आहे, असे सिंग यांना सांगितले.

हेही वाचाः Money Mantra : ‘या’ ५ इक्विटी एसआयपी फंडांनी ३० टक्क्यांपर्यंत दिला परतावा; यादीत निप्पॉन, एचडीएफसीचाही समावेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्युच्युअल फंडाची एकूण एएमयू ४३ लाख कोटी

देशात ४३ म्युच्युअल फंड घराणी आहेत. मे महिन्यात त्यांची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता ४३.२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली. मुदतमुक्त फंडांमध्ये गुंतवणुकीचा ओघ काही प्रमाणात कमी होऊनही व्यवस्थापनखालालील मालमत्ता वाढली आहे. मुदतमुक्त फंडामधील गुंतवणूक एप्रिल महिन्यात त्यात १.२४ लाख कोटी रुपये होती. मात्र, मे महिन्यात गुंतवणुकीचे प्रमाण कमी होऊन ती ५९ हजार ८७९ कोटी रुपये झाली.