देशातील सर्वात नावाजलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे केवळ भारतातीलच नव्हे, तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांना श्रीमंत करण्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचा मोठा वाटा आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) १७ ट्रिलियन बाजारमूल्य असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा १० वर्षांपेक्षा जुना विक्रम मोडीत काढला आहे. बाजार भांडवलानुसार मुकेश अंबानींची रिलायन्स ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी होती. तसेच ही एक दशकाहून अधिक काळ देशातील सर्वात फायदेशीर कंपनी ठरली होती. तेल, दूरसंचार आणि रिटेल क्षेत्रात काम करणाऱ्या रिलायन्सने देशातील नफा कमावणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले होते, परंतु आता स्टेट बँक ऑफ इंडियाने तिच्याकडून हे बिरुद हिसकावून घेतले आहे.

एसबीआयने रिलायन्सला टाकले मागे

बिझनेस स्टँडर्डच्या एका बातमीनुसार, चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीच्या (एप्रिल-जून) निकालांमध्ये SBI ने देशात सर्वाधिक नफा कमावला आहे. या प्रकरणात रिलायन्सला एसबीआयने मागे टाकले आहे. एसबीआयचा एप्रिल-जूनमध्ये १८,५३७ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा १६,०११ कोटी रुपये आहे.

हेही वाचाः पेपरफ्रायचे सह संस्थापक आणि सीईओ अंबरीश मूर्ती यांचे निधन

एसबीआयने १२ महिन्यांत जबरदस्त कामगिरी केली

‘TTM’ म्हणजे ‘Trailing 12 Months’ हा शब्द अनेकदा शेअर बाजारात वापरला जातो. याचा अर्थ असा आहे की, गेल्या १२ महिन्यांत कंपनीची कामगिरी सतत कशी आहे. याचा हिशेब केला तरी एसबीआयने रिलायन्सला मागे टाकले आहे. गेल्या २० वर्षांत हे दुसऱ्यांदा घडले आहे, जेव्हा SBI ने TTM नुसार सर्वाधिक नफा कमावला आहे.

हेही वाचाः IT क्षेत्रालाही मंदीचा फटका; टीसीएस, इन्फोसिस, विप्रोमधील नोकऱ्या गायब?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जूनमध्ये संपत असलेल्या या टीटीएमच्या आधारे एसबीआयचा एकत्रित नफा ६६,८६० कोटी रुपये झाला आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजचा नफा ६४,७५८ कोटी रुपये आहे. यापूर्वी जुलै-सप्टेंबर २०११ मध्ये SBI चा नफा सर्वाधिक १८,८१० कोटी रुपये होता. तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजला १८,५८८ कोटी रुपयांचा नफा झाला होता.