लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने मंगळवारच्या सत्रात पुन्हा उच्चांकी दौड कायम राखली. सकारात्मक जागतिक संकेत आणि ग्राहकोपयोगी वस्तू आणि तेल कंपन्यांच्या समभागांमध्ये चौफेर खरेदी झाल्याने सेन्सेक्सने सत्रांतर्गत ७१,६२३ अंशांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली.

दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १२२.१० अंशांनी वधारून ७१,४३७.१९ पातळीवर बंद झाला. दिवसभरात, त्याने ३०८.६२ अंशांची कमाई करत ७१,६२३.७१ असा सार्वकालिक उच्चांक गाठला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ८६.४ अंशांनी वधारून २१,५०५.०५ या विक्रमी शिखरावर पोहोचला. तो अखेर ३४.४५ अंशांनी वाढून २१,४५३.१० पातळीवर बंद झाला.

हेही वाचा >>>‘आयटी रिटर्न’ भरला साडेसात कोटींनी, करदाते अवघे सव्वा दोन कोटी, शून्य करदायित्व असणाऱ्यांची स्ंख्या वाढून ५.१६ कोटींवर

व्यापक बाजारपेठेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनी आशावाद कायम ठेवला. युरोपीय महासंघामधील महागाई दराच्या आकडेवारीच्या घोषणेपूर्वी गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतला. युरोपातील महागाईदेखील नरमण्याची शक्यता आहे, असे मत जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी व्यक्त केले.

सेन्सेक्समध्ये नेस्लेचा समभाग ४.६६ टक्क्यांनी वधारला. त्यापाठोपाठ एनटीपीसी (२.१६ टक्के), रिलायन्स इंडस्ट्रीज (१.५३ टक्के), स्टेट बँक (१.०४ टक्के) आणि हिंदुस्थान युनिलिव्हरचा समभाग (१.०३ टक्के) तेजीत होता. आयटीसी, पॉवर ग्रिड आणि बजाज फायनान्स या समभागांनाही मोठा फायदा झाला. तर विप्रो, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह आणि मारुतीच्या समभागात घसरण झाली.

सेन्सेक्स ७१,४३७.१९ १२२.१० ( ०.१७)

निफ्टी २१,४५३.१० ३४.४५ ( ०.१६)

डॉलर ८३.१९ ९

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेल ७७.७२ -०.३०