मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३५४ अंशांनी वधारून प्रथमच विक्रमी ७५,००० अंशांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने बुधवारी २२,७५३ अंशांचा नवा उच्चांक गाठला. ग्राहकपयोगी वस्तू, ऊर्जा आणि धातू कंपन्यांच्या समभागांमधील वाढीने निर्देशांकांनी उच्चांकी दौड कायम ठेवली आहे.

दिवसअखेर, सेन्सेक्स ३५४.४५ अंशांनी वधारून ७५,०३८.१५ या सर्वोच्च पातळीवर स्थिरावला. दिवसभरात निर्देशांकाने ४२१.४४ अंशांची मुसंडी घेत किंवा ७५,१०५.१४ अंशांची पातळी गाठली. तर निफ्टीने १११.०५ टक्क्यांची भर घालत २२,७५३.८० अंशांचे विक्रमी शिखर स्थिरावला. दिवसभरात, तो १३२.९५ अंशांनी वाढून २२,७७५.७० या सर्वोच्च पातळीला स्पर्श केला.

Sensex falls due to rising tensions in Gulf countries and equity sell off
समभाग विक्रीच्या तुफान माऱ्याने सेन्सेक्स ८२ हजारांखाली
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Indices Sensex and Nifty decline to highs print eco news
नफावसुलीने ‘सेन्सेक्स’ची २६४ अंशांनी गाळण
Sensex Nifty high index print eco news
सेन्सेक्स-निफ्टीचे उच्चांकी शिखर
Sensex, Indexes record high, Sensex latest news,
निर्देशांकांची विक्रमी शिखरझेप! सेन्सेक्स ८५ हजारांच्या वेशीवर
Vishal Bariya
इन्फ्रास्ट्रक्चर फंड : स्वयंप्रकाशित तू तारा…
most overworked countries
Most Overworked Countries in World : जगातील कोणत्या देशात सर्वाधिक तास काम करावं लागतं? भारतात किती तास काम केलं जातं?
Sensex hits two century high
‘फेड’च्या व्याजदर कपातीनंतर निर्देशांकांची उच्चांकी मुसंडी, सेन्सेक्सची दोन शतकी उसळी

हेही वाचा…मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला

भारतीय भांडवली बाजार हे आशियाई आणि युरोपीय भांडवली बाजाराच्या किंचित मागे असले तरी, व्यापक बाजारपेठेतील मजबूत कामगिरीमुळे त्यांनी गती कायम ठेवली आहे. अमेरिकेतील महागाई दराची आकडेवारी आणि त्यांनतर फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाबाबत बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे, असे निरीक्षण जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांनी नोंदवले.

सेन्सेक्समधील आघाडीच्या समभागांमध्ये, आयटीसी, कोटक महिंद्र बँक, भारती एअरटेल, स्टेट बँक, एशियन पेंट्स, टेक महिंद्र, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नेस्ले यांचे समभाग वधारले. तर मारुती, एचडीएफसी बँक, लार्सन अँड टुब्रो आणि महिंद्र अँड महिंद्रच्या समभागात घसरण झाली. मंगळवारच्या सत्रात परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी ५९३.२० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली.

हेही वाचा…Gold-Silver Price on 10 April 2024: सोने-चांदी पुन्हा महागले, पाहा आजचा भाव

सेंसेक्स ७५,०३८.१५ ३५४.४५ (०.४७%)

निफ्टी २२,७५३.८० १११.०५ (०.४९%)
डॉलर ८३.१९ -१२

तेल ८९.५८ ०.१८