लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : इक्विटी म्युच्युअल फंडांनी सरलेल्या मार्च महिन्यात २२,६३३ कोटी रुपये आकर्षित केले, जे त्या आधीच्या (फेब्रुवारी) महिन्याच्या तुलनेत १६ टक्क्यांनी कमी आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया अर्थात ‘अॅम्फी’ने बुधवारी दर्शविलेल्या आकडेवारीनुसार, इक्विटी फंडात सलग ३७ व्या महिन्यात गुंतवणुकीचा सकारात्मक ओघ राहिला आहे. एकंदरीत, म्युच्युअल फंड उद्योगाने फेब्रुवारीमध्ये १.२ लाख कोटी रुपयांचा ओघ पाहिल्यानंतर, मार्च महिन्यात मात्र त्यातून १.६ लाख कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला आहे. रोखे संलग्न म्युच्युअल फंड योजनांमधून सर्वाधिक १.९८ लाख कोटी रुपयांचे निर्गमन झाले.

Sensex Hits Record, High, 75 thousands Points, Nifty Touches 22753 Points, sensex nifty high, share market, stock market, finance, finance knowledge, finance article, share market high, stoke markte high, marathi news,
सेन्सेक्स प्रथमच ७५ हजारांवर विराजमान
“आम्ही तुमची माफी स्वीकारणार नाही, कारवाईला सामोरे जा”; बाबा रामदेव यांचा माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

आकडेवारीनुसार, समभाग संलग्न अर्थात इक्विटी योजनांमध्ये फेब्रुवारीमध्ये २६,८६६ कोटी रुपयांच्या तुलनेत मार्चमध्ये २२,६३३ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. दरम्यान, नियोजनबद्ध गुंतवणुकीचा पर्याय असलेल्या सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स अर्थात ‘एसआयपी’च्या माध्यमातून सलग दुसऱ्या महिन्यात १९,००० कोटी रुपयांच्या गुंतवणूक झाली. ‘अॅम्फी’च्या आकडेवारीनुसार, ‘एसआयपी’च्या माध्यमातून फेब्रुवारीमध्ये १९,१८७ कोटी रुपयांची गुंतवणूक झालीहोती . त्यातुलनेत मार्च महिन्यात ती १९,२७१ कोटी रुपये अशी किंचित वाढली.

आणखी वाचा-पेटीएम पेमेंट्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्याधिकारी सुरिंदर चावला यांचा राजीनामा

स्मॉल कॅप फंडाकडे पाठ

स्मॉलकॅप म्युच्युअल फंडांनी मार्चमध्ये प्रथमच ३० महिन्यांच्या कालावधीनंतर निर्गमन अनुभवले. सरलेल्या महिन्यात गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅप फंडातून ९४ कोटी रुपयांचा निधी काढून घेतला. फेब्रुवारीमध्ये स्मॉलकॅप म्युच्युअल फंडांमध्ये २,९२२.४५ कोटी रुपयांचा निव्वळ प्रवाह आला होता. याआधी सप्टेंबर २०२१ मध्ये स्मॉलकॅप फंडांतून २४९ कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला होता. गेल्या महिन्यात रिझर्व्ह बँक आणि सेबी यांसारख्या नियामक संस्थांनी व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणारे मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांतील वाढलेल्या मूल्याकंनाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे सरलेल्या महिन्यात स्मॉलकॅप कंपन्यांच्या समभागांनी घसरण अनुभवली. या व्यतिरिक्त सर्व समभाग संलग्न श्रेणींनी सकारात्मक ओघ अनुभवला.

मिडकॅप फंडामध्ये फेब्रुवारीमध्ये १,८०८.१८ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. त्या तुलनेत मार्चमध्ये ती ४४ टक्क्यांनी घसरून १,०१८ कोटींवर मर्यादित राहिली. लार्जकॅप फंडांमध्ये उलट प्रवाह निदर्शनास आला. या श्रेणीतील गुंतवणूक मार्चमध्ये १३१ टक्क्यांनी वाढून २,१२८ कोटी रुपयांवर पोहोचली होती.

आणखी वाचा-‘बैजूज’च्या कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन मार्गी

निश्चित-उत्पन्न श्रेणीमध्ये, रोखे संलग्न म्युच्युअल फंडांतून सुमारे २ लाख कोटी रुपयांचा निधी गुंतवणूकदारांनी काढून घेतला. लिक्विड फंडांतून नक्त १,५७,९७० कोटी आणि अल्ट्रा-शॉर्ट फंडातून ९,१३५ कोटी रुपये काढण्यात आले.

गंगाजळी घसरली

म्युच्युअल फंड उद्योगाच्या व्यवस्थापनाखालील निव्वळ मालमत्ता गेल्या महिन्यात किंचित घसरून ५३.४० लाख कोटी रुपयांवर आली आहे, जी फेब्रुवारीअखेर ५४.५४ लाख कोटी रुपये होती.