लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : रिलायन्स उद्योग समूहाचे लक्ष्य अल्पकालीन नफा आणि संपत्तीच्या संग्रहणाचे नसून देशासाठी संपत्ती निर्माण करण्याचे ध्येय आहे, असे प्रतिपादन रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केले.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अंबानी बोलत होते. ते म्हणाले की, कंपनी देशातील ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने काम करीत आहे. कंपनी आता तंत्रज्ञानाची निव्वळ निर्मात्री बनली असून, ती नावीन्यपूर्ण ‘डीप टेक’ क्षेत्रात ती रूपांतरित होत आहे. कृत्रिम प्रज्ञेच्या शोधामुळे मानवासमोरील गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्याची संधी निर्माण झाली आहे.

आणखी वाचा-Hurun India Rich List : अदानी अंबानींची जागा घेत सर्वात श्रीमंत भारतीय

देशाच्या अर्थव्यवस्थेचे गुलाबी चित्र रेखाटताना ते म्हणाले की, भारत हे विकासाचे केवळ एक वाहन नव्हे, तर जागतिक अर्थव्यवस्थेचे सर्वांत मोठे इंजिन बनले आहे. भारत आता जगातील सर्वात मोठी इंटनरनेट (डेटा) बाजारपेठ बनली आहे आणि जिओ दरमहा सरासरी ३० गिगाबाइटपेक्षा जास्त डेटा वापरणाऱ्या ४९ कोटी ग्राहकांसह जागतिक मोबाइल डेटा कंपनी बनली आहे. जागतिक डेटा रहदारीत सुमारे आठ टक्के वाटा असणाऱ्या जिओने मोठ्या जागतिक सेवा प्रदात्याला तिने मागे टाकले आहे. जिओने ५जी आणि ६जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात ३५० पेटंट दाखल केले असल्याचे अंबानी यांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-‘मूडीज’कडून विकासदर अंदाजात वाढ; ‘फिच’चे पतमानांकन जैसे थे!

अंबानी यांच्या भाषणांतील ठळक वैशिष्ट्ये

  • ठोस वित्तीय पायावर २०२७ पर्यंत ‘रिलायन्स’च्या मूल्यात दुप्पट वाढ
  • रिलायन्स रिटेलचा बाजारमूल्यानुसार, अव्वल १० किराणा कंपन्यांत समावेश
  • ५जी आणि ६जी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जिओकडून ३५० पेटंट दाखल
  • दरमहा १० लाख ब्रॉडबँड जोडणीने युक्त घरे जोडण्याचे जिओचे उद्दिष्ट
  • डिस्नेच्या विलीनीकरणाचे मनोरंजन क्षेत्रात नव्या पर्वाची नांदी
  • ‘जिओ एआय क्लाउड’द्वारे जिओधारकांना १०० जीबीपर्यंत क्लाउड स्टोरेज मोफत