SpiceJet announces Independence Day sale : विमानाने प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही नुकतेच विमानानं प्रवास करण्याचा विचार करीत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. देशातील सर्वात मोठ्या एअरलाइन कंपनीपैकी एक असलेल्या स्पाइसजेटने आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. ऑफर अंतर्गत प्रवाशांना फक्त १५१५ रुपयांमध्ये हवाई प्रवास करण्याची संधी मिळू शकते. कंपनीने स्पेशल इनक्रेडिबल इंडिपेंडन्स डे सेल अंतर्गत याची घोषणा केली आहे. स्पाइसजेटचा सेल आजपासून सुरू झाला असून, तो २० ऑगस्टपर्यंत चालणार आहे. ऑफर अंतर्गत तुम्ही पुढील वर्षी १५ ऑगस्ट ते ३० मार्च २०२४ पर्यंत या बजेटमध्ये प्रवास करू शकता. ऑफरचे उर्वरित तपशील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहे नेमकी ऑफर?

१५१५ रुपयांच्या फ्लाइट तिकिटांव्यतिरिक्त स्पाइसजेट २००० रुपयांपर्यंतचे मोफत फ्लाइट व्हाऊचरदेखील देत आहे. याशिवाय एअरलाइन कंपनी १५ रुपयांमध्ये पसंतीची सीट निवडण्याची संधी देत आहे. २० ऑगस्टपर्यंत तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता.

हेही वाचाः महागाईच्या आघाडीवर दिलासा, जुलैमध्ये घाऊक महागाईचा दर उणे १. ३६ टक्के राहिला

या ठिकाणांना भेट देऊ शकता

मुंबई-गोवा, जम्मू-श्रीनगर, गोवा-मुंबई, गुवाहाटी-बागडोगरा, चेन्नई-हैदराबाद यांसारख्या लोकप्रिय देशांतर्गत मार्गांवर १५१५ रुपयांची एकेरी विमान प्रवास ऑफर मिळू शकते. ही ऑफर थेट देशांतर्गत बुकिंगवर वन-वे भाड्यावर वैध आहे. या ऑफर अंतर्गत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार असून, त्याला पसंतीची सीटदेखील मिळणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, हा फायदा ग्रुप बुकिंगमध्ये मिळणार नाही आणि तो इतर कोणत्याही ऑफरबरोबर जोडला जाऊ शकत नाही.

हेही वाचाः चॅटजीपीटीवर दररोज ‘इतका’ कोटी खर्च; OpenAI पुढील वर्षापर्यंत कंगाल होण्याच्या मार्गावर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००० रुपयांचे व्हाऊचर दिले जाणार

कंपनीच्या म्हणण्यानुसार, सेल संपल्यानंतर सात दिवसांच्या आत बुकिंग केल्यावर ग्राहकांना २००० रुपयांपर्यंतचे मोफत फ्लाइट व्हाउचर मिळतील. हे एकल वापरासाठी आहेत आणि इतर कोणत्याही ऑफरसह एकत्रित केले जाऊ शकत नाहीत. तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा तत्त्वावर १५ रुपयांमध्ये पसंतीची आसन निवडीची ऑफर दिली जात आहे. ही ऑफर स्पाइसजेटच्या नेटवर्कवर उपलब्ध आहे. यामध्ये वेबसाइट, एम-साइट, मोबाइल अॅप, आरक्षणे आणि निवडक ट्रॅव्हल एजंट यांचा समावेश आहे.