ChatGPT Bankrupt : आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टुडिओ OpenAI साठी वाईट बातमी आहे. OpenAI पुढील वर्षी दिवाळखोरीत निघू शकते, असं एका अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. ओपनएआयला त्यांची एआय सेवा चॅटजीपीटी चालविण्यासाठी दररोज सुमारे ७००,००० डॉलर म्हणजेच ५.८० कोटी रुपये खर्च करावे लागतात, असं अॅनालिटिक्स इंडिया मॅगझिनच्या अहवालात म्हटले आहे. तसेच सॅम ऑल्टमनच्या नेतृत्वाखालील OpenAI सध्या रोखीच्या तुटवड्याशी झुंजत असून, GPT-3.5 आणि GPT-4 चे सुरू करूनही कंपनीला आवश्यक तेवढा महसूल अद्याप मिळवता आलेला नाही.

२०२२ मध्ये लाँच करण्यात आले

ChatGPT नोव्हेंबर २०२२ मध्ये लाँच करण्यात आले आणि ते इतिहासातील सर्वात वेगाने वाढणारे अॅप बनले. जरी सुरुवातीला ग्राहकांनी ते हाताळले असले तरी गेल्या काही महिन्यांचा ट्रेंड बघता त्यात युजर्स सामील होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जर आपण Similarweb च्या डेटावर नजर टाकल्यास जुलै अखेरीस ChatGPT चा यूजर बेस आणखी कमी झाल्याचं समोर आलं आहे. आकडेवारीनुसार, जूनच्या तुलनेत जुलै २०२३ मध्ये वापरकर्त्यांमध्ये १२ टक्के घट झाली आहे. पूर्वी १.७ अब्ज वापरकर्ते होते, जे आता १.५ अब्ज वापरकर्ते झाले आहेत.

credit card spending soar to 27 percent
क्रेडिट कार्ड उसनवारी २७ टक्क्यांनी वाढून १८.२६ लाख कोटींवर
Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच
Loksatta anvyarth wheat rates Pradhan Mantri Garib Kalyan Food Yojana to Central Government
अन्वयार्थ: गव्हाचा सरकारी तिढा!

हेही वाचाः अदाणी-हिंडेनबर्ग चौकशीसाठी आणखी १५ दिवस द्या; सेबीची सुप्रीम कोर्टात मागणी

१ अब्ज डॉलर्सचे लक्ष्य

अॅनालिटिक्स इंडिया मॅगझिनच्या अहवालानुसार, कंपनीचा API हासुद्धा समस्येचा एक भाग आहे. यापूर्वी अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना चॅटजीपीटी वापरण्यास मनाई करीत होत्या. पण नंतर त्यांनी OpenAI चे API घेण्याचे काम सुरू केले. या कारणास्तव ते त्यांच्या कामासाठी स्वतःचे AI चॅटबॉट्स तयार करण्यास सक्षम झाले. OpenAI सध्या फायदेशीर नाही.

हेही वाचाः डॉलरच्या तुलनेत रुपया १० महिन्यांच्या नीचांकावर; ८३ च्या खालच्या पातळीवर घसरण

मे महिन्यात चॅटजीपीटी बनवण्यास सुरुवात झाली. या कारणास्तव त्याचे नुकसान दुप्पट होऊन ५४० दशलक्ष डॉलर झाले. मायक्रोसॉफ्टने यात १० बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे, कदाचित त्याच कारणासाठी कंपनी कार्यरत आहे. OpenAI ने २०२३ मध्ये वार्षिक कमाई २०० दशलक्ष डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे. २०२४ साठी त्याचे लक्ष्य १ अब्ज डॉलर आहे.