पुणे : देशातील इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम्स डिझाइन आणि उत्पादन क्षेत्रातील सिरमा एसजीएस टेक्नॉलॉजी कंपनीने पुण्यातील रांजणगावमध्ये सर्वांत मोठे इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्र सुरू केले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन सिरमा एसजीएसचे कार्यकारी अध्यक्ष संदीप टंडन यांच्या उपस्थितीत झाले. सिरमाचा हा नवीन उत्पादन प्रकल्प २६.५ एकर जागेत विस्तारलेला आहे.

हेही वाचा >>> युनियन बँकेवर वित्तीय गुप्तचर यंत्रणेकडून ५४ लाखांचा दंड; मुंबईतील शाखेतील संशयास्पद व्यवहारांच्या देखरेखीत अपयशाचा ठपका

यातील १२ लाख चौरस फूट जागेवर उत्पादन केंद्र स्थापण्याचे कंपनीचे नियोजन आहे. पहिल्या टप्प्यात ६० हजार चौरस फुटांवर उत्पादन केंद्र सुरू होईल. त्यातून सुमारे एक हजार प्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील. या प्रकल्पामुळे सिरमा एसजीएसच्या प्रिंटेड सर्किट बोर्डच्या जुळणी क्षमतेत वाढ होणार आहे. यातून देशांतर्गत वाहन निर्मिती आणि औद्योगिक क्षेत्राकडून वाढणारी मागणी पूर्ण करणे कंपनीला शक्य होईल. या वेळी बोलताना कंपनीचे अध्यक्ष संदीप टंडन म्हणाले की, इलेक्ट्रॉनिक सिस्टीम्स डिझाइन आणि उत्पादनात सिरमा ही आघाडीची कंपनी आहे. उद्योगातील अत्याधुनिक गोष्टींचा स्वीकार करून कंपनी नावीन्यपूर्ण उत्पादनांवर ती भर देत आहे. शाश्वत विकासाला प्राधान्य देत उत्कृष्ट मापदंडानुसार उत्पादन घेण्यावर लक्ष्य केंद्रित केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.