लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : सरलेल्या २०२३ सालात म्युच्युअल फंडांतील एकूण गुंतवणुकीचा ओघ लक्षणीय वाढून, त्यात वर्षभरात सुमारे ११ लाख कोटी रुपयांची विक्रमी वाढ नोंदविण्यात आली. परिणामी देशातील ४४ म्युच्युअल फंड घराण्यांकडे जमा एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेने डिसेंबर २०२३ अखेर ५० लाख कोटी रुपयांचा अनोखा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. सकारात्मक भांडवली बाजार, स्थिर व्याजदर आणि गतिमान आर्थिक विस्तार यामुळे या गुंतवणुकीने कमालीची गती धारण केल्याचे दिसून येत आहे.

म्युच्युअल फंड उद्योगांची शिखर संघटना ‘ॲम्फी’ने मागील वर्षातील या उद्योगाच्या कामगिरीचा अहवाल सोमवारी जाहीर केला. या अहवालानुसार, मागील वर्षभरात म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचा ओघ लक्षणीयरीत्या वाढून, नक्त गुंतवणुकीत १०.९ लाख कोटी रुपयांची म्हणजेच २७ टक्क्यांची भर पडली आणि एकूण मालमत्ता इतिहास प्रथमच ५०.७८ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

400 lakh crore market cap milestone of Mumbai Stock Exchange
विश्लेषण : ७५ हजारांचे शिखर… ४०० लाख कोटींचे बाजारभांडवल… शेअर बाजार आणखी किती तेजी दाखवणार?
Delayed purchase of passenger vehicles by 3 lakh 22 thousand 345 customers in the month of March
प्रवासी वाहनांच्या विक्रीत घट, मार्च महिन्यात ३ लाख २२ हजार ३४५ ग्राहकांकडून खरेदी लांबणीवर
HDFC Bank shares up 3 percent on rise in deposits loans
ठेवी, कर्जातील वाढीने एचडीएफसी बँक समभागाची ३ टक्क्यांनी झेप
IPO, financial year 2023-24, investments, companies, 62,000 crore,
‘आयपीओ’द्वारे २०२३-२४ मध्ये ६२,००० कोटींची निधी उभारणी

हेही वाचा >>>India-Maldives Row : भारतातून मालदीवला जाणारी विमान उड्डाणे बंद होणार का? ज्योतिरादित्य शिंदेंनी स्पष्ट सांगितलं

आधीच्या म्हणजे २०२२ सालात म्युच्युअल फंड मालमत्तेत ५.७ टक्के वाढीसह, २.६५ लाख कोटी रुपयांची भर पडली होती. तसेच त्यापूर्वी २०२१ मधील मालमत्तेत जवळपास ७ लाख कोटी रुपयांची (सुमारे २२ टक्के) वार्षिक तुलनेत भर पडली होती, त्या तुलनेत २०२३ सालातील वाढीचे प्रमाण हे कितीतरी जास्त आहे.

सलग ११ वर्षे वाढीची…

म्युच्युअल फंड उद्योगात २०२३ मध्ये सलग ११ वर्षे वाढ नोंदविण्यात आली आहे. डिसेंबर २०२२ अखेर देशात कार्यरत सर्व म्युच्युअल फंड घराण्यांकडील व्यवस्थापनयोग्य असलेली एकूण मालमत्ता (एयूएम) ३९.८८ लाख कोटी रुपये होते. त्या आधीच्या वर्षत डिसेंबर २०२१ अखेर एयूएमचे प्रमाण ३७.७२ लाख कोटी रुपये आणि डिसेंबर २०२० अखेर ते ३१ लाख कोटी रुपये होते. त्या आधीच्या दोन वर्षांत म्हणजे २०१२ आणि २०११ सालात म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत घट झाली होती.

समभागसंलग्न अर्थात इक्विटी योजनांमध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली असून, ती नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘एसआयपी’ पद्धतीने झाली आहे. डिसेंबरमध्ये इक्विटी फंडांमध्ये १६,९९७ कोटी रुपये गुंतवणूकरूपात जोडले गेल्याने, सरलेल्या २०२३ वर्षात इक्विटी योजनांमधील एकूण गुंतवणूक १,६१,५७३ कोटींवर पोहोचली. तर रोखेसंलग्न अर्थात डेट म्युच्युअल फंडांमध्ये ४६,०८९ कोटी रुपयांचा प्रवाह दिसून आला. भांडवली बाजारातील वाढ, स्थिर व्याज दर आणि अर्थव्यवस्थेची वेगाने होत असलेली वाढ या गोष्टी म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीचा ओघ वाढण्यास कारणीभूत ठरली, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा >>>अदाणी समूहाचा सिमेंट क्षेत्रातील मोठा करार, ACC ने एशियन काँक्रीट आणि सिमेंटची केली खरेदी

मासिक ‘एसआयपी’ ओघ डिसेंबरमध्ये १७,६१० कोटींवर

किरकोळ गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडात केलेल्या गुंतवणुकीसाठी २०२३ हे वर्ष निःसंशयपणे सकारात्मक ठरले आहे. डिसेंबरमध्ये १७,६१० कोटी रुपये इतका सार्वकालिक उच्चांकी ‘एसआयपी’ ओघ पाहिल्यानंतर कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये एकूण ‘एसआयपी’ प्रवाह १,८३,७४१ कोटी रुपयांवर गेला आहे. आधीच्या २०२२ सालात, ‘एसआयपी’च्या माध्यमातून गुंतवणुकीची मात्रा १,४९,४३७ कोटी रुपये होती. २०२३ मध्ये त्यात २३ टक्के वाढ झाली आहे. ‘एसआयपी’ खात्यांतर्गत व्यवस्थापनाखालील मालमत्ता (एयूएम) नोव्हेंबर २०२३ मधील ९,३१,३३३ कोटी रुपयांच्या तुलनते डिसेंबर २०२३ अखेर ९,९५,९२५ कोटी रुपये झाली आहे.

डिसेंबर २०२३ मध्ये नवीन नोंदणीकृत ‘एसआयपी’ची संख्या ४०,३२,६४३ इतकी होती, ज्यामुळे एकूण ‘एसआयपी’ फोलिओंची संख्या ७,६३,६५,९२४ झाली आहे. तर डिसेंबर २०२३ मध्ये एकूण म्युच्युअल फंड फोलिओंची संख्या १६,४८,९०,२७२ असा सार्वकालिक उच्चांक गाठणारी आहे.