‘बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ दि इयर’ पुरस्काराची  उपविजेती 

ठाणे : देशातील नागरी सहकारी बँकांतील अग्रणी असलेल्या, मल्टीस्टेट टीजेएसबी सहकारी बँकेला इंडियन बॅंक्स असोसिएशन या बँकिंग क्षेत्रातील नावाजलेल्या संस्थेने सन्मानित केले आहे. टीजेएसबी सहकारी बँकेची तंत्रज्ञान पूरक सुलभ ग्राहकसेवेच्या प्रभावी कामगिरीची दखल घेऊन इंडियन बॅंक्स असोसिएशनने तीन पुरस्कार दिले आहेत.

हेही वाचा >>> भारतीय विमान कंपनीतही नोकरकपातीचे वारे; ‘स्पाईसजेट’कडून हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड 

टीजेएसबी सहकारी बँकेला बेस्ट डिजिटल सेल्स, पेमेंट आणि एंगेजमेन्ट यासाठी प्रथम पुरस्कार, बेस्ट टेक टॅलेंट आणि ऑर्गनायझेन यासाठी प्रथम पुरस्कार आणि बेस्ट टेक्नॉलॉजी बँक ऑफ दि इयरसाठी व्दितीय पुरस्कार शुक्रवार, दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी सायंकाळी मुंबई, नरिमन पॉईंट येथील ट्रायडंट येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात देण्यात आले.

हेही वाचा >>> ‘पेटीएमवरील कारवाईचा फेरविचार नाही’; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची स्पष्टोक्ती

टीजेएसबी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल आणि व्यवस्थापकीय संचालक, मुख्य कार्यकरी अधिकारी सुब्बलक्ष्मी शिराली यांनी हे पुरस्कार भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर टी. रबी संकर यांच्या हस्ते स्वीकारले. यावेळी बँकेच्या आयटी विभागाचे, डिजिटल कक्षाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात सहभागी झालेल्या बँकिंग, फायनान्स, तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवरांनी बँकेचे विशेष कौतुक केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रसह गोवा, गुजराथ, कर्नाटक, मध्यप्रदेश या पाच राज्यातून एकशे अडोतीस शाखांतून टीजेएसबी सहकारी बँक कार्यरत आहे. बँकेचा एकूण व्यवसाय वीस हजार नऊशे चौपन्न कोटींचा आहे. निव्वळ नफा रुपये एकशे त्र्याहत्तर कोटींचा आहे. बँकेचा नेट एनपीए शून्य आहे.