US Fed Rate Cut : अमेरिकी मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हकने २९ ऑक्टोबर रोजी पुन्हा व्याजदरामध्ये कपात केली आहे. यावेळी दरांमध्ये ०.२५ टक्के (२५ बेसिस पॉइंट) कपात करत ३.७५ टक्के ते ४ टक्क्यांच्या दरम्यान दर करण्यात आला आहे, म्हणजेच येथे बँकांना कर्ज घेणे पहिल्यापेक्षा थोडे स्वस्त झाले आहे. फेडने व्याजदरांमध्ये कपात करम्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२५ मध्ये इतकी मोठी कपात करण्यात आली होती.
फेडने घोषणा केली आहे की ते १ डिसेंबरपासून त्यांच्या एसेट परचेस कपात (Quantitative Tightening) प्रोग्राम बंद करतील. म्हणजेच बाजारात आता पहिल्यापेक्षा जास्त लिक्विडिटी राहिल.
फेडरल रिझर्व्हने काय सांगितलं?
फेडरल ओपन मार्केट कमेटी (FOMC)ने सांगितले की सध्याच्या परिस्थितीत दर कपात करणे आवश्यक होते जेणेकरून अर्थव्यवस्थेला सपोर्ट मिळू शकेल. कमेटीच्या म्हणण्यांनुसार, अमेरिकन अर्थव्यवस्था सध्या मंद वेगाने पुढे जात आहे. नोकरीच्या संधी कमी झाल्या आहेत आणि बेरोजगारी थोडी वाढली आहे. तसेच महागाई पहिल्यापेक्षा वाढलेली आहे.
सरकारी शटडाउमुळे अमेरिकेत रोजगार आणि महागाईसंबंधी ताजी आकडेवारी मिळू शकलेली नाही. ज्यामुळे फेड अधिकऱ्यांसाठी धोरणात्मक निर्णय घेणे आव्हानात्मक बनले आहे.
व्याज दर कमी का करण्यात आली?
फेडरल रिझर्व्हचे काम हे महागाई नियंत्रणात आणणे आणि रोजगार वाढवणे हे असते. मात्र जेव्हा अर्थव्यवस्था सुस्त पडते तेव्हा व्याज दरांमध्ये कपात केली जाते, जेणेकरून कंपन्यांना स्वस्त कर्ज घेता येईल आणि गुंतवणुकीला चालना मिळेल. यामुळे रोजगारात वाढ होते. फेडने असेही स्पष्ट केले की सध्या आर्थिक अनिश्चितता जास्त आहे, म्हणजेच पुढील स्थितीबद्दल माहिती नाही की गोष्टी कोणत्या मार्गाने पुढे जातील.
पुढे काय होणार?
यूएस फेडचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी सांगितले की, सध्यातरी प्राथमिकता अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवणे ही आहे. सप्टेंबरमध्ये फेड अधिकाऱ्यांनी संकेत दिले होते की जर स्थिती कमकुवत राहिली तर, यावर्षी दोन वेळा कपात केली जाऊ शकते.
२०२४ मध्ये फेडने तीन वेळा व्याजदरांमध्ये कपात केली होती, मात्र नंतर डोनाल्ड ट्रम्प यांची धोरणे आणि टॅरिफचा परिणाम समजून घेण्यासाठी दर स्थिर ठेवण्यात आले. २०२५ च्या जुलै पर्यंत दर ४.२५ टक्के – ४.५० टक्क्यांच्या मध्ये होता. अमेरिकेत सध्या सीपीआय महागाई दर ३ टक्के आहे, जे अपेक्षेपेक्षा कमी आहे. फेडचे ध्येय आहे की हा दर २ टक्क्यांच्या आसपास आणला जावा.
भारतावर काय परिणाम होणार?
अमेरिकेत व्याजदर कमी झाल्याचा थेट परिणाम जगभरातील बाजारांवर होतो. भारतावर देखील याचा परिणाम दिसू शकतो. तज्ज्ञांच्या मते गुंतवणूकदार आता अमेरिकन बाँडच्याऐवजी उदयोन्मुख बाजारपेठा (Emerging Markets) जसेकी भारतात गुंतवणूक वाढू शकते. यामुळे आयटी, फार्मा आणि निर्यात यांच्याशी संबंधित कंपन्यांना फायादा होऊ शकतो.
