PAN Card Full Form, Importance, Documents : पॅन कार्ड (पर्मनंट अकाऊंट नंबर) हे भारतातील सर्व करदात्यांना प्राप्तिकर विभागाकडून जारी केलेले एक महत्त्वाचे ओळखपत्र आहे. हा एक १० अंकी अल्फान्यूमेरिक कोड आहे, जो व्यक्ती आणि संस्थांसाठी सर्व करसंबंधित माहितीची नोंद करतो. पॅन कार्ड आर्थिक व्यवहारांसाठी प्राथमिक दस्तऐवज म्हणून काम करते; म्हणून बँक खाते उघडणे, कर भरणे आणि व्यवसाय नोंदणी करणे यांसारख्या विविध आर्थिक कामांसाठी तुमच्याकडे ‘पॅन कार्ड‘ असणे आवश्यक आहे. ते सरकारला तुम्ही केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्यास मदत करते आणि योग्यरित्या कर लागू होईल हे सुनिश्चित करते. पॅन कार्ड हे भारतातील जवळजवळ प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आवश्यक असलेले एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे.

भारतातील आर्थिक व्यवहार करणाऱ्या प्रत्येकासाठी पॅन कार्डचे विविध प्रकार आणि पॅन कार्ड अर्जासाठी पात्रता निकष समजून घेणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

पॅन कार्डचा आढावा (PAN Card Overview )

पॅन जारी करण्याचा अधिकार (Authority Issuing PAN) : आयकर विभाग, भारत सरकार
पॅन कस्टमर केअर क्रमांक (PAN Customer Care Number): ०२० : २७२१८०८०
पॅन कार्डची स्थापना (Inception of PAN Card) :१९७२
पॅन कार्डची वैधता (Validity Of PAN Card): आयुष्यभर
पॅन कार्डची किंमत (Cost of PAN Card) : ६६ रुपये ते १,०१७ रुपये
पॅन कार्ड अर्ज करण्याची पद्धत (PAN Card Application Mode): ऑनलाइन आणि ऑफलाइन

पॅन कार्ड म्हणजे काय? (What is PAN Card?)

आयकर विभाग एक १० अंकी कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) असलेले पॅन कार्ड जारी करतो. पॅन विविध कारणांसाठी एखाद्या व्यक्तीचा किंवा संस्थेचा ओळखीचा पुरावा म्हणून काम करतो. एखाद्या व्यक्तीची सर्व करसंबंधित माहिती त्या व्यक्तीच्या पॅनवर नोंदवली जाते.

पॅन हा एक १० अंकी अल्फान्यूमेरिक वर्ण (Alphanumeric Character) आहे, तर पॅन कार्ड हे एक भौतिक स्वरुपात (physical) किंवा डिजिटल कार्ड आहे, ज्यामध्ये पॅन आणि त्या व्यक्तीबद्दलची इतर महत्त्वाची माहिती असते.

आयकर विभागाने १ जानेवारी २०१७ रोजी सुरू केलेल्या पॅन कार्डच्या नवीन फॉरमॅटनुसार, सर्व पॅन कार्डमध्ये कार्डधारकाची माहिती असलेला क्विक रिस्पॉन्स (QR) कोड दिलेला असतो. हा कोड डेटा पडताळणीसाठीदेखील वापरला जाऊ शकतो. त्यात कार्डधारकाचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख आणि स्वाक्षरीदेखील असते.

पॅन कार्डमधील माहिती (PAN Card Contents)

पॅनकार्डमध्ये विविध प्रकारची माहिती असते.

  • कार्डधारकाचे नाव (Name of the cardholder) : एखाद्या व्यक्तीचे नाव, भागीदारी (पार्टनरशीप) फर्मचे नाव, एलएलपी आणि कंपनी
  • कार्डधारकाच्या वडिलांचे नाव Name of the father of the cardholder): हे फक्त एखाद्या व्यक्तीच्या पॅनकार्डकरिता लागू होते. कार्डधारकाच्या वडिलांचे किंवा आईच नाव (जर एकल पालकत्व (single parent) असेल तर) कार्डवर दिलेले असते.
  • तारीख (Date) : एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत कार्डधारकाची जन्मतारीख किंवा कंपनी किंवा फर्मच्या बाबतीत नोंदणीची तारीख.
  • पॅन क्रमांक (PAN Number) : हा १० अंकी अल्फा न्यूमेरिक क्रमांक आहे. त्यातील प्रत्येक अक्षर कार्डधारकाबद्दल माहिती दर्शवितो.
  • सही (Signature) : हे फक्त एखाद्या व्यक्तीच्या पॅनकार्डसाठी लागू होते. पॅन कार्ड हे आर्थिक व्यवहारासाठी एखाद्या स्वाक्षरीचा पुरावा म्हणूनदेखील वापरता येते.
  • फोटो (Photograph) : पॅनकार्ड हे एखाद्या व्यक्तीच्या ओळखीचा पुरावा म्हणून वापरले जाते. कंपनी किंवा फर्मच्याबाबत कोणताही फोटो कार्डवर नसतो.

कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) ची रचना (Structure of Permanent Account Number (PAN)

पॅन हा १० अंकी अल्फान्यूमेरिक क्रमांक आहे आणि प्रत्येक अक्षर कार्डधारकाची वेगळी माहिती दर्शवतो.

  • पहिले तीन अक्षरं : हे पूर्णपणे वर्णक्रमानुसार आहेत आणि त्यात A ते Z पैकी तीन अक्षरे असतात.
  • चौथे अक्षर : चौथे अक्षर हे करदात्याच्या श्रेणीचे प्रतिनिधित्व करणारी वर्णमाला आहे. विविध घटक आणि त्यांचे संबंधित वर्ण खालीलप्रमाणे आहेत:
    A : व्यक्तींची संघटना (Association of Persons)
    B : व्यक्तींची संस्था अथवा मंडळ (Body of Individuals)
    C : कंपनी(Company)
    F : फर्म (Firms)
    G : सरकार (Government)
    H : हिंदू अविभाजित कुटुंब (Hindu Undivided Family)
    L : स्थानिक प्रशासन (Local Authority)
    J : कृत्रिम न्यायिक व्यक्ती( Artificial Judicial Person)
    P : व्यक्ती (Individual)
    T : ट्रस्टसाठी व्यक्तींची संघटना (Association of Persons for a Trust)
  • पाचवे अक्षर : पाचवे अक्षर म्हणजे व्यक्तीच्या आडनावाचे पहिले अक्षर असते.
    पुढील ४ अक्षरं : पुढील ४ अक्षरे पूर्णपणे संख्यात्मक स्वरूपाची आहेत आणि ज्यामध्ये ०:९ मधील संख्या आहेत.
    शेवटचे अक्षर : शेवटचे अक्षर म्हणजे वर्णमालेतील अक्षर असते.

पॅन कार्डचे प्रकार (Types of PAN)

भारतातील कर भरणाऱ्या संस्थांना दिले जाणारे पॅन कार्डचे हे विविध प्रकार आहेत:

  • अल्पवयीन आणि विद्यार्थ्यांसह व्यक्ती (Individual, including minors and students)
  • हिंदू अविभाजित कुटुंब (Hindu Undivided Family (HUF)
  • कंपनी (Company)
  • भागीदारी फर्म्स (Partnership Firms)
  • मर्यादित दायित्व भागीदारी (Limited Liability Partnership (LLP))
  • ट्रस्ट (Trusts)
  • सोसायटी (Society)
  • व्यक्तींची संघटना (Association Of Person (AOP)
  • व्यक्तींची संस्था अथवा मंडळ (Body of Individuals (BOI))
  • परदेशी (Foreigners)

पॅन कार्डासाठीचे अर्ज (PAN Card Forms)

पॅन कार्ड अर्जांचे ३ प्रकार आहेत, जे खालीलप्रमाणे आहेत:

  • अर्ज ४९अ (Form 49A) – भारतीय नागरिक, ज्यामध्ये अल्पवयीन मुलं, अनिवासी भारतीय, भारताबाहेरील नागरिक, भारतीय कंपन्या, भारतीय कंपन्या आणि पॅन कार्ड नसलेले भारतीय बीओआय/एओपी यांचा समावेश आहे. यांना पॅनकार्ड मिळवण्यासाठी ४९ए (Form 49A) अर्ज भरावा लागतो.
  • अर्ज ४९अअ (Form 49AA) – पॅन कार्डसाठी आवश्यक असलेल्या सर्व परदेशी नागरिकांना हा अर्ज भरावा लागेल.
  • सध्याच्या पॅनमध्ये बदल किंवा दुरुस्त्या/ पॅन कार्ड रिप्रिंटसाठी (Changes or Corrections in existing PAN/ Reprint of PAN card) : ज्या लोकांकडे आधीच पॅन आहे, परंतु त्यांना त्यांच्या पॅन कार्डच्या माहितीमध्ये बदल किंवा दुरुस्त्या करायच्या आहेत त्यांना हा अर्ज भरावा लागतो. पण, जे लोक कोणत्याही बदलाशिवाय सध्याचे पॅन कार्ड पुन्हा प्रिंट करू इच्छितात ते देखील हा अर्ज भरू शकतात.

पॅन कार्ड मिळवण्यासाठी पात्रता (PAN Card Eligibility) :

सर्व भारतीय नागरिक आणि अनिवासी भारतीय (एनआरआय) पॅन कार्डसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. कंपन्या, फर्म, व्यक्तींची संघटना, हिंदू अविभाजित कुटुंबे इत्यादी सर्व कृत्रिम संस्थादेखील पॅन कार्डसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. पण, भारतात कर भरणाऱ्या आणि भारतात आर्थिक व्यवहार करणाऱ्या सर्वांसाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.

पॅन कार्ड अर्ज (PAN Card Form) :

पॅन कार्ड अर्ज सोप्या पद्धतीने ऑनलाइन किंवा ऑफलाइन जमा करता येतो.

What is PAN Card| PAN Card Full Form, Importance, How to Apply for it and Documents
पॅन कार्ड म्हणजे काय| पॅन कार्ड अर्ज प्रक्रिया (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम

पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया (Process to apply for PAN card online)

NSDL वर पॅन कार्ड अर्ज करण्याची प्रक्रिया (Process to Apply PAN Card on NSDL)

  • NSDLच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
  • अर्जाचा प्रकार, श्रेणी निवडा, तपशील प्रविष्ट करा आणि ‘सबमिट करा’ वर क्लिक करा.
  • टोकन नंबर असलेला एक संदेश तुमच्या ईमेल आयडीवरदेखील पाठवला जाईल. ‘पॅन अर्ज अर्जासह पुढे जा’ बटणावर क्लिक करा.
  • कागदपत्रे सादर करण्याची पद्धत आणि पॅन कार्डची प्रत आवश्यक असल्यास निवडा. अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • प्रक्रिया शुल्क भरा आणि पावती क्रमांक किंवा संदर्भ क्रमांकाची प्रिंटआउट घ्या.
  • जर तुम्ही पॅन कार्डची प्रत (फिजीकल स्वरुपात) पाठवण्याचा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला कागदपत्रे आणि भरलेला अर्ज प्रोटीन ईगव्ह टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या (Protean eGov Technologies Limited) आयकर पॅन सेवा युनिटला पाठवावा लागेल.
  • अर्ज ऑनलाइन जमा केल्यानंतर किंवा आयकर पॅन सेवा युनिट कार्यालयात १५-२० दिवसांच्या आत पॅन कार्ड पाठवले जाईल.

UTIITSL वर पॅन कार्ड अर्ज करण्याची प्रक्रिया (Process to Apply PAN Card on UTIITSL)

  • UTIITSL अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • ‘भारतीय नागरिक/एनआरआयसाठी पॅन कार्ड’ किंवा ‘परदेशी नागरिकांसाठी पॅन कार्ड’ टॅब अंतर्गत ‘क्लिक टू अप्लाई’ पर्यायावर क्लिक करा.
  • ‘अप्लाय फॉर न्यू पॅन कार्ड’ टॅब निवडा.
  • कागदपत्रे सादर करण्याची पद्धत, अर्जदाराची स्थिती, पॅन कार्ड मोड निवडा आणि ‘सबमिट’वर क्लिक करा.
  • तुम्हाला एक रेफरन्स क्रमांक मिळेल, त्यानंतर ‘ओके’वर क्लिक करा.
  • वैयक्तिक तपशील, कागदपत्रांची माहिती, संपर्क क्रमांक आणि पालकांची माहिती, पत्ता तपशील आणि इतर तपशील प्रविष्ट करा आणि ‘नेक्स्ट स्टेप’वर क्लिक करा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि ‘सबमिट करा’वर क्लिक करा.
  • अर्जावरील तपशिलांची पडताळणी करा आणि शुल्क भरण्यासाठी ‘पेमेंट करा’ बटणावर क्लिक करा.
  • पेमेंट यशस्वीरित्या झाल्यानंतर, अर्जाचे प्रिंट आऊट घ्या. तुम्ही कागदपत्रे प्रत्यक्ष पाठविण्याचे निवडल्यानंतर तुम्हाला अर्ज आणि कागदपत्रे मुंबई, कोलकाता, चेन्नई किंवा नवी दिल्ली येथील UTIITSL पॅन पीडीसी प्रभारी कार्यालयांना पाठवावी लागतील.
  • एकदा अर्ज ऑनलाइन सबमिट केला किंवा UTIITSL कार्यालयात पोहोचला की, पॅन कार्डवर प्रक्रिया केली जाईल आणि १५ दिवसांत पाठवले जाईल.

पॅन कार्डसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया (Process to Apply for PAN Card Offline )

  • पॅन केंद्रांवरून पॅन कार्ड अर्ज मिळवा. ‘भारतीय नागरिकांसाठी अर्ज ४९ए’ किंवा ‘परदेशी नागरिकांसाठी अर्ज ४९एए’देखील डाऊनलोड करू शकता आणि अर्जाची प्रिंट काढू शकता.
  • अर्जावरील सर्व माहिती भरा, अलीकडील रंगीत फोटो आणि स्वाक्षरी जोडा.
  • अर्जासह आवश्यक कागदपत्रे जोडा.
  • नजीकच्या पॅन केंद्राला भेट द्या, सर्व कागदपत्रांसह अर्ज सबमिट करा आणि आवश्यक शुल्क भरा.

पॅन कार्ड कागदपत्रे (PAN Card Documents)


विविध प्रकारच्या अर्जदारांसाठी पॅन अर्जाबरोबर खालील कागदपत्रे सादर करावी लागतील:

पॅन कार्ड आवश्यक कागदपत्रे
वैयक्तिक अर्जदार (Individual Applicant)ओळखीचा पुरावा (Proof of identity) : आधार कार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र, वाहन चालवण्याचा परवाना, रेशन कार्ड, शस्त्र परवाना, पेन्शनर कार्ड, सरकारी फोटो असलेले ओळखपत्र, केंद्र सरकारचे आरोग्य योजना कार्ड

पत्त्याचा पुरावा (Proof of Address ) : आधार कार्ड, स्वतःचा/पती/पत्नींचा पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पोस्ट ऑफिस किंवा बँक पासबुक, युटिलिटी (विज,पाणी) बिल, मालमत्ता कर ऑर्डर, अधिवास प्रमाणपत्र (Domicile certificate), मालमत्ता नोंदणी दस्तऐवज, नियोक्ता प्रमाणपत्र (Employer certificate)

जन्मतारखेचा पुरावा (Proof of Date of Birth) : आधार, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक, जन्म प्रमाणपत्र, सरकारी फोटो ओळखपत्र, अधिवास प्रमाणपत्र, विवाह प्रमाणपत्र
हिंदू अविभाजित कुटुंब (Hindu Undivided Family)
HUF चे प्रतिज्ञापत्र HUF च्या प्रमुखाने POI/POA तपशिलांसह जारी केले आहे.
भारतातील नोंदणीकृत कंपनी (Company registered in India)
कंपनी रजिस्ट्रारने जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र
मर्यादित दायित्व असलेली भागीदारी (Limited Liability Partnership (LLP)कंपनी रजिस्ट्रारने जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र.
भागीदारी फर्म (Partnership Firms)
फर्म्सच्या रजिस्ट्रार किंवा भागीदारी कराराद्वारे जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र.
ट्रस्ट (Trust)
ट्रस्ट डीडची प्रत किंवा धर्मादाय आयुक्तांनी जारी केलेल्या नोंदणी क्रमांकाच्या प्रमाणपत्राची प्रत.
AOP, BOI, स्थानिक प्रशासन किंवा कृत्रिम न्यायिक व्यक्ती (Artificial Juridical Person)धर्मादाय आयुक्त किंवा सहकारी संस्थेचे निबंधक किंवा इतर कोणत्याही सक्षम प्रशासनाने जारी केलेल्या कराराची प्रत किंवा नोंदणी क्रमांक प्रमाणपत्राची प्रत.
परदेशी नागरिक (Foreigners )ओळखीचा पुरावा (Proof of Identity ) : पासपोर्ट, पीआयओ/ओसीआय (PIO/ OCI) कार्ड, नागरिकत्व ओळख क्रमांक किंवा “अपोस्टिल”(“Apostille”) किंवा भारतीय दूतावास किंवा उच्चायोग किंवा वाणिज्य दूतावासाने योग्यरित्या प्रमाणित केलेला करदाता ओळख क्रमांक.
पत्त्याचा पुरावा (Proof of Address) : पासपोर्ट, पीआयओ/ओसीआय(PIO/ OCI ) कार्ड, बँक खाते विवरण (statement), भारतातील निवास प्रमाणपत्र, परदेशी नोंदणी कार्यालयाने जारी केलेले नोंदणी प्रमाणपत्र किंवा दिलेला व्हिसा आणि भारतीय कंपनीकडून नियुक्ती पत्राची प्रत.

PAN Card Fees (पॅन कार्ड शुल्क) :

खालील तक्त्यामध्ये पॅन कार्ड अर्जाचे शुल्क दिले आहे:

अर्ज सादर करण्याची पद्धतपॅन कार्ड पाठविण्याची पद्धतशुल्क (जीएसटीसह)
पॅन कार्डची प्रत मिळवण्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाइन अर्ज करणेभारतात पॅन कार्डची प्रत कार्ड पाठवणे रु. १०७
पॅन कार्डची प्रत मिळवण्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाइन अर्ज करणे
भारताबाहेर पॅन कार्डची प्रत पाठवणे
रु. १,०१७
पेपरलेस पद्धतीने ऑनलाइन पॅन अर्ज करणेभारतात पॅन कार्डची प्रत कार्ड पाठवणे रु. १०१
पेपरलेस पद्धतीने ऑनलाइन पॅन अर्ज करणे
भारताबाहेर पॅन कार्डची प्रत पाठवणे
रु. १,०११
पॅन कार्डची प्रत मिळवण्यासाठी ऑफलाइन किंवा ऑनलाइन अर्ज करणे
ई-पॅन कार्ड ईमेल आयडीवर पाठवणे
रु. ७२
पेपरलेस पद्धतीने पॅन अर्ज करणेई-पॅन कार्ड ईमेल आयडीवर पाठविणेरु. ६६


पॅन अर्जाची स्थिती कशी तपासू शकता (PAN Card Status)

एकदा तुम्ही पॅन कार्ड अर्ज जमा केल्यानंतर पॅन अर्जाची स्थिती तुम्ही खालील प्रक्रियेचे अनुसरण करून तपासू शकता.

  • NSDLच्या StatusTrack पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर पावती क्रमांक किंवा अर्ज क्रमांक आणि कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ‘सबमिट करा’ वर क्लिक करा.
  • पॅन कार्ड अर्जाची स्थिती स्क्रीनवर दिसून येईल.

पॅन कार्ड कसे डाऊनलोड करावे (PAN Card Download)

पॅन कार्ड प्रक्रिया आणि जनरेट झाल्यानंतर तुम्ही खालील प्रक्रियेचे अनुसरण करून डिजिटल स्वरूपात पॅन कार्ड डाउनलोड करू शकता

  • NSDL किंवा UTIITSL वेबसाइटला भेट द्या.
  • आवश्यक तपशील प्रविष्ट करा, जसे की पावती क्रमांक किंवा पॅन, जन्मतारीख इ.
  • OTP प्रविष्ट करा, शुल्क भरा (अलॉटमेंटच्या ३० दिवसांनंतर ई-पॅन डाउनलोड करण्यासाठी लागू) आणि ‘ई-पॅन डाउनलोड करा’ वर क्लिक करा.

पॅन कार्ड अपडेट/ दुरुस्ती (PAN Card Update/ Corrections )

तुमच्या पॅनची माहिती खालील प्रक्रियेद्वारे अपडेट करता येईल:

  • NSDL पोर्टल किंवा UTIITSL वेबसाइटवर जा.
  • “सध्याच्या पॅनमधील बदल किंवा सुधारणा / पॅन कार्ड पुन्हा प्रिंट करा”(Changes or Corrections in existing PAN/ Reprint of PAN card) असा अर्ज प्रकार निवडा.
  • पॅन कार्डवरील जी माहिती बदल करायची आहे ती प्रविष्ट करा, कागदपत्रे अपलोड करा आणि “सबमिट” बटणावर क्लिक करा.
  • प्रक्रिया शुल्क भरा.
  • पॅन १५ दिवसांच्या आत दिलेल्या पत्यावर पाठवले जाईल.

पॅन अर्ज भरताना काय करावे आणि काय करू नये (Do’s and Don’ts for Filling up PAN Form)

  • अर्जामध्ये फक्त सध्याचे आणि संबंधित तपशील भरले आहेत याची खात्री करा.
  • तुमच्या पत्त्यावर पॅन पाठवण्यासाठी पूर्ण आणि व्यवस्थित पत्ता भरला आहे याची खात्री करा.
  • नाव आणि आडनाव विभागात तुमचे संपूर्ण नाव आणि अडनाव लिहा, संक्षिप्त (शॉर्ट) स्वरूपात लिहू नका.
  • व्यक्तींव्यतिरिक्त इतर अर्जदारांना लिंग, पालकांची माहिती आणि निवासस्थानाचा पत्ता विभाग भरण्याची आवश्यकता नाही.
  • व्यक्तींच्या उत्पन्नाचा स्रोत जर पगार, व्यवसाय किंवा व्यवसाय नसेल तर कार्यालयाचा पत्ता भरण्याची आवश्यकता नाही.
  • व्यक्तींने नोंदणी क्रमांक (Registration Number) विभाग रिकामा सोडावा.
  • सहाय्यक कागदपत्रे स्व-प्रमाणित (self-attesting) करताना तुमच्या स्वाक्षरी किंवा अंगठ्याच्या ठशांसह संबंधित कागदपत्रे जोडा.
  • चुकीची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे नसतील तर अर्ज नाकारला जाऊ शकतो.

डुप्लिकेट पॅन कार्ड (Duplicate PAN card)

जर तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, तर तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. डुप्लिकेट पॅन कार्डसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  • NSDL किंवा UTIITSL वेबसाइटला भेट द्या.
  • पॅन, आधार क्रमांक, जन्मतारीख, GSTIN (लागू असल्यास) आणि कॅप्चा कोड यासारखे आवश्यक तपशील काळजीपूर्वक भरा आणि ते सबमिट करा.
  • OTP प्रविष्ट करा, आवश्यक शुल्क भरा आणि ते सबमिट करा.
  • मुद्रित पॅन कार्ड अर्जदाराच्या पत्त्यावर पाठवले जाईल.

आपल्याला पॅनकार्डची आवश्यकता का आहे? (Why do You Need PAN?)

पॅन कार्ड हे विविध ठिकाणी आपली ओळख आणि आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक आहे. हा एक ओळख क्रमांक आहे, जो भारतातील प्रत्येक कर भरणाऱ्या घटकाला (tax-paying entity) खालील गोष्टी करण्यासाठी फायदेशीर ठरतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • ओळखीचा पुरावा म्हणून पॅन कार्ड वापरता येते.
  • पत्त्याचा पुरावा म्हणून पॅन कार्ड वापरता येते.
  • कर भरण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.
  • व्यवसायाच्या नोंदणीसाठी पॅन कार्ड वापरता येते.
  • बँक खाती उघडण्याची आणि चालवण्याची पात्रता दर्शवण्यासाठी पॅन कार्ड वापरता येते.
  • फोन कनेक्शन आणि गॅस कनेक्शनसाठी पॅन कार्ड वापरता येते.
  • म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी पॅन कार्ड फायदेशीर ठरते.
  • एका दिवसात ५०,००० रुपयांपेक्षा जास्त बँक ठेवीसाठी पॅन कार्ड वापरणे अनिवार्य आहे.
  • मालमत्ता आणि वाहने खरेदी करण्यासाठी (दोन चाकी वगळता)पॅन कार्ड वापरणे अनिवार्य आहे.
  • १०,००० रुपयांपेक्षा जास्त सर्व बँक व्यवहारांसाठी पॅन कार्ड वापरणे अनिवार्य आहे.

ई-केवायसीसाठी पॅन का आवश्यक आहे? [ PAN for e-KYC (Know Your Customer)]

  • सेवा प्रदात्यांकडून सेवा आणि फायदे मिळविण्यासाठी ई-केवायसी (e-KYC ) आणि पडताळणीसाठी (verification) पॅन आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे. पॅन-आधारित ई-केवायसी हे पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ करते, ज्यामुळे वापरकर्ते आणि सरकार दोघांसाठीही ते सोपे आणि अधिक कार्यक्षम पर्याय ठरतो. का ते जाणून घ्या..
  • ई-केवायसी प्रक्रिया कागदविरहित आहे, ज्यामुळे सेवा प्रदात्याला कागदपत्रे सहज आणि कार्यक्षमतेने हाताळता येतात.
  • पॅन कार्डधारक काही मिनिटांतच सुरक्षित माध्यमाद्वारे सेवा प्रदात्याबरोबर माहिती शेअर करू शकतात, त्यामुळे सामान्यतः पॅन कार्डची प्रतच्या पडताळणीसाठी लागणारा दीर्घ प्रतीक्षा कालावधी कमी होतो.
  • वापरकर्ता आणि सेवा प्रदात्यामध्ये शेअर केलेली डिजिटल कागदपत्रे आणि छेडछाड-प्रतिरोधक (tamper-proof) असतात आणि सुरक्षित चॅनेलद्वारे पाठवले जातात, जे पॅन कार्डधारकाची माहिती सुरक्षित ठेवते.
  • ही कागदपत्रे बनावट करता येत नाहीत किंवा सेवा प्रदाता आणि पॅन कार्डधारक दोघांच्याही संमतीशिवाय त्यांचा वापर करता येत नाही.

भारतातील प्रत्येक करदात्यासाठी आणि आर्थिक व्यवहार करणाऱ्या व्यक्तीसाठी पॅन कार्ड हे एक आवश्यक दस्तऐवज आहे. कोणत्याही व्यक्ती, कंपनी किंवा ट्रस्ट, संस्थेच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या प्रकारचे पॅन कार्ड उपलब्ध आहेत. ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करून पॅन कार्ड मिळवणे आता सोपे आणि सुलभ झाले आहे, ज्यामुळे तुम्हाला विविध प्रकारच्या बँकिंग आणि गुंतवणूक सेवांचा लाभ सहजपणे घेता येतो.