EPF Benefits And ​​Important : महिन्याच्या एका ठरावीक तारखेला पगार आपल्या खात्यात जमा होतो. पगार झाल्याचा आनंद तर असतोच. पण, दुसरीकडे पगार कापून हाती येतो याच दुःखसुद्धा असतंच. पगार कापून जातो तेव्हा कधी कधी त्यात दिवाळीचा बोनस, तुमचा पीएफ (EPF) आणि आणखीन बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. पण, अनेकदा हे काही जणांना पटत नाही. “आम्ही आमचे पैसे स्वतः सेव्ह करू”, असे अनेक जण म्हणून जातात. पण, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किंवा पीएफ या खात्यांना एक प्रकारे बचत योजना म्हणून देखील पाहिलं जातं. तर आज आपण या बातमीतून जॉब करणाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी का महत्त्वाचा? त्याचे नक्की काय फायदे होतात? पाच वर्षांआधी तुम्ही पीएफची रक्कम काढल्यावर काय होईल ? त्याबद्दल जाणून घेऊया…

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किंवा EPF म्हणजे काय? (What Is EPF)

EPFO ही भारत सरकारची एक संस्था आहे, जी कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी योजना राबवते. या योजनेत तुमच्या प्रत्येक महिन्याला येणाऱ्या पगारातून निश्चित केल्यानुसार रक्कम कापली जाते आणि तुमच्या पीएफ (EPF) खात्यात ती जमा केली जाते. तुम्ही निवृत्तीनंतर हे पैसे काढू शकता किंवा आर्थिक गरजांसाठी त्यावर कर्जदेखील घेऊ शकता. तसेच जमा होणाऱ्या EPF च्या विपरीत, FD तुम्हाला निश्चित कालावधीसाठी निश्चित व्याजदरावर एकरकमी गुंतवणूक करण्याची परवानगी देते.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या अंतर्गत कोणत्या योजना दिल्या जातात? (Schemes Offered Under EPFO)

  • कर्मचारी पेन्शन योजना (EPS)
  • कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना(EPF)
  • एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI)

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे फायदे (Benefits Of Employee Provident Fund Eligibility)

१. निवृत्ती बचत – EPF तुमच्या निवृत्तीनंतरच्या काळासाठी उपयुक्त ठरू शकतो. तुम्ही नियमित योगदान दिल्यामुळे कालांतराने एक मोठा निधी तयार होतो, जो तुमच्यासाठी फायदेशीर ठरतो.

२. कर फायदे – तुमचे EPF मध्ये जमा झालेली रक्कम योगदान आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत करमुक्त असते. त्याव्यतिरिक्त EPF मध्ये गुंतवलेले पैसे, त्यावर मिळणारे व्याज आणि नंतर मिळणारी रक्कम या सर्व आर्थिक बाबी करमुक्त असतात.

३. आर्थिक सुरक्षितता – EPF ही एक सरकारी योजना आहे, जी तुम्हाला सुरक्षा आणि त्यावर तुम्हाला निश्चित परतावा (fix interest/profit) देते.

४. पैसे काढणे – वैद्यकीय गरज, वाहन खरेदी अशा विशिष्ट परिस्थितीत तुम्ही निवृत्तीपूर्वी तुमच्या EPF मधून पैसे काढू शकता.

पीएफ बॅलन्स कसा तपासायचा? (How To Check PF Balanced)

सरकारने एकाच प्लॅटफॉर्ममध्ये सर्व सरकारी सेवांबद्दल माहिती घेण्यासाठी उमंग अ‍ॅप लाँच केले आहे. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर युटिलिटी बिल अ‍ॅक्सेस करू शकता आणि तुमच्या सर्व सरकारी खात्यांमध्ये सहजपणे प्रवेश करू शकता. तर तुमचा पीएफ बॅलन्स ऑनलाइन स्वरूपात तपासण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा…

  • अर्ज सुरू करताना EPFO पर्याय निवडा.
  • Employee Centric Services वर जा.
  • ‘View Passbook’ सेक्शनवर क्लिक करा आणि तुमचा यूएएन एंटर करा.
  • त्यानंतर तुम्हाला ओटीपी जनरेट करण्यास सांगितले जाईल.
  • आता तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी तिथे टाका.
  • त्यानंतर View passbook पर्याय अनलॉक होईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व ईपीएफ खात्यांची माहिती अगदी सहजगत्या पाहता येईल.

पाच वर्षांआधी तुम्ही ईपीएफ का काढू नये (Why you shouldn’t withdraw the EPF before 5 years)

आपत्कालीन परिस्थितीत ईपीएफमधून तुम्ही कर्ज घेऊ शकता. पण, तुमच्या ईपीएफ निधीची संपूर्ण रक्कम काढून घेतलीत, तर तुम्हाला मिळणारे अतिरिक्त फायदे मिळू शकणार नाहीत. पाच वर्षांआधी तुम्ही तुमचा ईपीएफ का काढू नये याची दोन महत्त्वाची कारणे खालीलप्रमाणे :

१. तुमच्या रकमेवर कर आकारला जाईल – जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी तुमच्या ईपीएफमधून कोणतीही रक्कम काढली, तर तुम्ही काढलेली रक्कम तुमच्या करपात्र उत्पन्नात जोडली जाईल. तसेच, जर पाच वर्षापूर्वी तुम्ही काढलेली रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर ती रक्कम १०% कर सवलतीस पात्र आहे. पण, जर तुम्ही तुमच्या आयकर रिटर्नसह 15G किंवा आयटी फॉर्म सबमिट केलात, तर तुम्हाला ही रक्कम भरण्यापासून सूट मिळू शकते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२. तुम्हाला कलम 80c चे फायदे मिळणार नाहीत – जर तुम्ही कलम 80c अंतर्गत तुमच्या पीएफ अकाउंटमधून संपूर्ण ईपीएफ काढून घेतला, तर तुमच्या पगारावर मिळणाऱ्या व्याजावर इतर स्रोतांमधून मिळणाऱ्या उत्पन्नाप्रमाणे कर आकारला जाईल.

पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी खालील आवश्यक कागदपत्रे तुमच्याजवळ असणे महत्त्वाचे आहे… (What Are The Documents Required For Withdrawal Of PF)

  • युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) – तुमचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर तुमच्या जवळ असणे गरजेचे आहे.
  • बँक खात्याची माहिती – ज्या बँक खात्यात ईपीएफचे पैसे येतात, त्या बँक खात्याची आवश्यक माहिती असणे आवश्यक आहे.
  • ओळख आणि पत्त्याचा पुरावा – तुमची ओळख आणि तुमच्या पत्त्याविषयी माहिती पुरविणारी कागदपत्रे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. (जसे की आधार कार्ड, पासपोर्ट किंवा मतदार ओळखपत्र).
  • Cancelled चेक – सोप्या पद्धतीने पीएफ खात्यातील पैशांचा व्यवहार करण्यासाठी आयएफएससी कोड (IFSC CODE) आणि खाते क्रमांक असलेला Cancelled चेक असणे आवश्यक आहे.

पीएफ रक्कम ऑनलाईन कशी चेक करायची? (How To Check PF Balanced Online)

  • EPFO वेबसाइटला भेट द्या आणि UAN व पासवर्ड वापरून लॉग इन करा.
  • ‘Manage tab’वर क्लिक करा आणि तुमची KYC माहिती व्हेरिफाय करा.
  • त्यानंतर तुम्ही ‘Our Services’ सेक्शनला भेट द्या आणि ड्रॉप-डाउन सूचीमधून ‘Claim’ असे लिहिलेल्या शीर्षकावर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘I Want to Apply for’ विभागाखाली तुम्हाला कोणत्या पद्धतीचे पैसे काढायचे आहेत, ते निवडा.
  • त्यानंतर एक ड्रॉप-डाउन बॉक्स तुम्हाला कोणत्या प्रकारचे पैसे काढण्यासाठी पात्र आहात ते दाखवेल.
  • एकदा तुम्ही पैसे काढण्याची पद्धत निवडली की, तुमची EPF काढण्याची ऑनलाइन प्रक्रिया मंजूर होईल.
  • मग रक्कम १० दिवसांच्या आत थेट तुमच्या खात्यात जमा होईल.

पीएफ रक्कम ऑफलाईन कशी चेक करायची? (How To Check PF Balanced Offline)

  • पीएफ काढण्यासाठी फॉर्म घ्या आणि तो काळजीपूर्वक भरा.
  • तुमच्या सर्व KYC कागदपत्रांच्या झेरॉक्स काढा आणि त्या बँक कर्मचाऱ्यांकडे द्या.
  • तुम्हाला पीएफ का काढायचा आहे यासाठी पत्र तयार करा आणि ईपीएफ कार्यालयात ते सादर करा.
  • तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर अर्जाच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या आत तुम्ही मागितलेली रक्कम तुम्हाला दिली जाईल.