Warren Buffett : जगातील अब्जाधीश म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे यांच्याबाबतची एक महत्वाची माहिती समोर आली आहे. खरं तर वॉरेन बफे हे गुंतवणुकीच्या जगात राज्य करतात. कारण वॉरेन बफे हे गुंतवणुकीत कायम सर्वोच्च स्थानावर असतात. त्यांच्या शेअर्स निवडण्याच्या कौशल्यासाठी त्यांना ओळखलं जातं. तसेच वॉरेन बफे यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी देखील ओळखलं जातं.

वॉरेन बफे यांनी आपल्या एकूण संपत्तीमधील अनेक अब्ज डॉलरपेक्षा जास्त किंमतींचे शेअर दान करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं. दरम्यान, वॉरेन बफे यांची एकूण संपत्ती किती १४० अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. तसेच अनेक लक्झरी कारसह विविध क्षेत्रात त्यांची गुंतवणूक आहे. मग असं असतानाही अब्जाधीश म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे हे सोन्याकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहत नाहीत.

अब्जाधीश असलेला व्यक्ती सोन्याकडे गुंतवणुकीचा पर्याय म्हणून पाहत नाही हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र, होय हे खरं आहे. कारण वॉरेन बफे हे स्पष्टपणे सांगतात की, त्यांची सोन्यात कोणतीही गुंतवणूक नाही. तसेच ते असाही सल्ला देतात की सोन्यासारख्या मालमत्तेत गुंतवणूक करू नका. तसेच सोने त्यांच्या मूल्य गुंतवणूक धोरणाशी जुळत नसल्याचं ते सांगतात. या संदर्भातील वृत्त फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिलं आहे.

वॉरेन बफे यांची एकमेव सोन्याची गुंतवणूक बॅरिक गोल्ड या सोन्याच्या खाणकाम करणाऱ्या कंपनीत होती. मात्र, ते त्या कंपनीमधून अवघ्या काही महिन्यांतच बाहेर पडले. दरम्यान, वॉरेन बफे हे २०११ मध्ये त्यांच्या शेअरहोल्डर्सना म्हणाले होते की, सोन्यात दोन कमतरता आहेत. त्या म्हणजे सोनं हे गैर उत्पादक घटक आहे. सोन्याचा उत्पादित वापर होत नाही. वॉरेन बफे हे सोन्याला एक उत्पादक नसलेली मालमत्ता मानतात.

दरम्यान, शेतीमध्ये गुंतवणूक करावी की सोन्यात गुंतवणूक करावी? यावर वॉरेन बफे यांनी म्हटलं होतं की, शेती आणि व्यवसाय यासारख्या उत्पादक मालमत्ता सोन्यासारख्या निर्जीव मालमत्तेच्या तुलनेत दीर्घकालीन गुंतवणुकीपेक्षा चांगल्या आहेत. तसचे शेअरमध्ये पैसा गुंतवल्यास तुम्ही त्या कंपनीचे मालक होता. त्यामुळे सोनं हा गैर उत्पादक घटक असल्याचं मत ते व्यक्त करतात.