प्रमोद पुराणिक

एखादया कंपनीच्या समभागांची किंवा कर्ज रोख्यांची विक्री असली, तर अपशकुन करायचा नसतो. हे मंदीवाल्यांना मान्य नसते. तेजीवाल्यांना तर तेजी करून नफा कमावण्याचा अधिकार आहे. तर मंदीवाल्यांनादेखील मंदी करून पैसा कमावण्याचा अधिकार आहे. मात्र या लढाईतला अंतिम विजेता तेजीवाला असतो. या बाजारात तेजीवाल्यांना मंदीवाला आवश्यक असतो त्याचप्रमाणे मंदीवाल्यांनादेखील तेजीवाल्यांची गरज असते. या बाजारात भूमिका बदलत असतात.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
senior scams increasing
फसवे फोन कॉल ते ऑनलाइन हस्टलिंग; आजी-आजोबांच्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले; कारण काय? संरक्षणात्मक उपाय काय?
firecrackers of worth rs 30000 stolen after beating up seller in baner
बाणेरमध्ये फटाका विक्रेत्याला मारहाण करुन  लूट; ऐन दिवाळीत लूटमार; ३० हजारांचे फटाके चोरुन चोरटे पसार
fake branch of state bank open in Chhattisgarh
आमची कुठेही शाखा नाही!
market leading stock for 50 years was Tata Deferred
बाजारातली माणसं- बाजाराला तालावर नाचवणारा समभाग : टाटा डिफर्ड
senior citizen cheated, Varad Properties,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
Should buy gold or diamond jewellery on Diwali
Money Mantra : दिवाळीत सोन्याचे की हिऱ्याचे दागिने घ्यावेत?

हेही वाचा >>>माझा पोर्टफोलियो / संशोधनाधारित नवोपक्रमशीलता ! : एसकेएफ इंडिया लिमिटेड 

भारतीय शेअर बाजारात परदेशी बोअर बाजारातील काही पद्धती फार उशिरा सुरू झाल्यात. बदला पद्धत बाजारात सुरू ठेवलीच पाहिजे अशा विचारसरणीचे अनेक सटोडिये होते. कंपनीला समभागांची विक्री करण्याचा हक्क होता. मात्र समभाग बाजारात सूचिबद्ध झाल्यानंतर बाजाराने कंपनीचे योग्य मूल्यांकन केले नाही तर बाजाराचे मूल्यांकन चुकलेले आहे. म्हणून जास्त भावाने कंपनीचे समभाग पुन्हा कंपनीचा अतिरिक्त निधीचा वापर करून पुनर्खरेदी (बायबॅक) करण्याचा अधिकार कंपनी कायद्याप्रमाणे प्रवर्तकांना दिलेला नव्हता.

सिनेसृष्टीत घडलेला इतिहास जर हरिश्चंद्राची फॅक्टरी, बालगंधर्व असे चित्रपट निर्माण करून तो काळ पुन्हा बघण्याची आणि अनुभवण्याची संधी उपलब्ध करता होते. मग देशांच्या भांडवल बाजारात ४१ वर्षांपूर्वी एक महान नाट्य घडले होते. कधी नव्हे तो तीन दिवस बाजार बंद ठेवावा लागला होता. शब्दांच्या माध्यमातून कागदावर ती घटना पुन्हा जिवंत करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.धीरुभाईनी १९८२ ला ५० कोटी रुपयांचा परिवर्तनीय कर्ज रोखे विक्रीचा प्रस्ताव प्राथमिक बाजारात आणला होता. २० मे १९८२ ला तो इश्यू बंद होणार होता.

हेही वाचा >>>‘पोर्टफोलियो’ची बांधणी

मनू माणेक नावाचा एक दलाल मंदीवाल्यांचा राजा होता. त्याची प्रचंड ताकद आणि मोठी यंत्रणा होती. कोबरा गॅंग असे त्यासंबंधित व्यक्तींना म्हटले जायचे. वेगाने वाढणाऱ्या रिलायन्सला जर अडथळा निर्माण केला नाही तर बाजारात आपले अस्तित्व शिल्लक राहणार नाही, असे काही मंडळींना वाटत होते. बाजारात त्या वेळेस रोजच्या रोज खरेदी-विक्रीचे तेजी-मंदीचे व्यवहार चालत होते. पंधरा दिवसांच्या कालखंडात स्वत:कडे समभाग नसले तरी त्या समभागांची विक्री करता यायची आणि पैसे नसले तरी वायद्यात समभागांची खरेदी करता यायची. काही समभाग फक्त रोखीच्या स्वरूपातच खरेदी करता यायचे म्हणून त्यांना रोखीचा गट आणि दुसऱ्या गटाला वायदा गट म्हटले जायचे. पंधरा दिवसांचा कालखंड दिलेला असायचा सौदापूर्तीच्या दिवशी समभाग खरेदी करणाऱ्याने पैसे मोजून समभागांची खरेदी करायची आणि जर त्यांच्याकडे खरेदीसाठी पैसा उपलब्ध नसला तर एका कालखंडाचा सौदा दुसऱ्या कालखंडात पुढे ओढला जावा याची विनंती करता येत होती आणि यासाठी बाजारात पैसे पुरवणारे लोक होते त्यांना बदला (सीधा) व्याज मिळायचे. या उलट खरेदी करणाऱ्यांकडे पैसे उपलब्ध आहेत पण, विकणाऱ्याकडे समभाग उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे खरेदी करणाऱ्याचा पैसा पडून राहिला म्हणून त्याचे व्याज मोजावे लागत होते, त्याला उधा बदला असे नाव होते. दर पंधरा दिवसांनी या प्रमाणे व्यवहाराची जुळवणी केली जायची त्याला पतावट असे नाव होते.

३० एप्रिल १९८२ शुक्रवार या दिवशी रिलायन्सची खरेदी करणाऱ्या फ्रेंड्स ऑफ रिलायन्स असोसिएशन या संस्थेने मंदीवाल्यांकडे ८,५७,००० समभागांची मागणी केली. परंतु मंदीवाल्यांकडे समभाग नव्हते. म्हणून त्यांनी सौदा उभा ठेवण्याची विनंती केली. अशा वेळेस मंदीवाल्यांसमोर दिवसा डोळ्यासमोर काजवे चमकले. अशा वेळेस मिळेल त्या भावात वेगवेगळ्या बाजारातून समभागांची खरेदी सुरू झाली. यामध्ये रिलायन्सचे ऑड लॉटदेखील मंदीवाल्यांनी वाटेल त्या भावात खरेदी केले. धीरुभाईनी मंदीवाल्यांना आणखी मोठा दणका दिला. समभागामागे ५० रुपये बदला मागण्यात आला आणि बदला भरला नाही तर सौदा पुढे ओढला जाणार नाही असे स्पष्ट सांगितले. आणि त्यात पुन्हा मंदीवाल्यांना आणखी एक फटका बसला, तो म्हणजे खरेदी करणाऱ्याने आम्हाला जर मार्केट लॉट मिळाले तरच ती डिलिव्हरी योग्य डिलिव्हरी समजली जाईल, असे जाहीर केले. त्यामुळे तर मंदीवाल्यांचे कंबरडेच मोडले. कारण रिलायन्सच्या समभागांचा व्यवहाराचा मार्केट लॉट ५० समभागांचा होता. डीमॅट संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. अत्यंत जास्त भावाने गळ्यात पडलेले ऑड लॉट ५० रुपये उधा बदला आणि किंमत आणखी किती वाढेल अशा घटनेमुळे तेजीवाले आणि मंदीवाले यांच्यातील संघर्ष कोणताही समझोता होणार नाही, अशा क्षणाला येऊन ठेपला आणि त्यामुळे भांडवली बाजार ३ दिवस बंद ठेवावा लागला.
यासंबंधीचे उपकथानक आणखी बरेच मोठे आहे. कोणत्या कंपन्यांनी पैसा मोजला? समभागांची खरेदी कोणी केली? त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते? त्यांनी काय काय खुलासे केले? रिझर्व्ह बँकेने खास तपास समिती नेमली. शेवटी फक्त एवढेच सगळ्या तपासातून बाहेर आले की, जे काही केले होते ते सगळे तेव्हा प्रचलित असलेल्या शेअर बाजारातल्या सर्व तरतुदींचा योग्य तो उपयोग करून झाले होते आणि त्यामुळे रिझर्व्ह बँकेलादेखील काहीही करता आले नाही.

हेही वाचा >>>क… कमॉडिटीचा : जिरे २०२३ मध्ये अधिक ‘खमंग’ होणार?

सरकार कोणतेही असो, उद्योगपती कोणीही असो या अगोदर असे घडले होते तेच पुढे घडणार आहे. नाटकातील पात्रे बदलतात पण नाटक चालूच राहते. धीरुभाई अंबानी आज हयात नाहीत. तत्कालीन अर्थमंत्री आज हयात नाही. कोणत्या परदेशी कंपन्या होत्या? त्यांची नोंदणी कुठे झालेली होती? ती केव्हा झाली? हे सर्व प्रश्न आता गौण आहेत. अखेर वाईटातून चांगले होते. त्यानुसार या घटनेमुळे पुण्याला शेअर बाजार स्थापन करण्याची मागणी पुढे आली. पुण्याचे उद्योजक बजाज, किर्लोस्कर, कल्याणी यांच्यासोबत मराठा चेंबर, बैंक ऑफ महाराष्ट्र यांनी पुढाकार घेऊन सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला आणि त्यामुळे पुणे शेअर बाजार जन्मास आला आणि तो बाजारदेखील आता संपला.

(लेखक नाशिकस्थित अर्थ-अभ्यासक व गुंतवणूक सल्लागार)