कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड (बीएसई कोड ५०६३९५)

प्रवर्तक: मुरूगप्पा समूह

बाजारभाव: रु. ९२८ /-

प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : खते/ कीटकनाशके

भरणा झालेले भागभांडवल: रु. २९.४० कोटी

शेअर होल्डिंग पॅटर्न (%) प्रवर्तक ५७.४१

परदेशी गुंतवणूकदार ९.४०

बँक / म्युच्युअल फंड/ सरकार १८.८६

इतर/ जनता १४.३३

पुस्तकी मूल्य: रु.२६९/-

दर्शनी मूल्य: रु. १ /-

गतवर्षीचा लाभांश: १२०० %

प्रति समभाग उत्पन्न: रु. ६८.४६

किंमत उत्पन्न गुणोत्तर: १३.६ समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: १०.१

रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड (आरओसीई): ३८.४%

डेट इक्विटी गुणोत्तर: ००

इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १५.२१

बीटा: ०.६

बाजार भांडवल: रु. २७,२९३ कोटी (लार्ज कॅप)

वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: १०९४/८३८

कृषी संपन्नतेत योगदान

कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड ही कृषीमूल्य शृंखलेत विविध उत्पादने आणि सेवा प्रदान करणारी भारतातील अग्रगण्य कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने खते, पीक प्रथिने, जैव कीटकनाशके, विशेष पोषक तत्त्वे, सेंद्रिय खत उत्पादनात आघाडीवर आहे. कंपनीचा व्यवसाय पोषक आणि इतर संबंधित उत्पादने (८५ टक्के महसूल) आणि पीक संरक्षण (१५ टक्के महसूल) अशा दोन विभागांत विभागलेला आहे. कंपनी देशांतर्गत बाजारात विविध प्रकारच्या फॉस्फेटिक खतांची विक्री करते. भारतातील युनिक ग्रेड खताच्या विक्रीत तिचा ४० टक्के वाटा आहे. कोरोमंडल भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी फॉस्फेट विक्रेता आणि १५ टक्के बाजार हिश्शासह सर्वात मोठी सिंगल सुपर फॉस्फेट (एसएसपी) विक्रेता आहे. पीक संरक्षण व्यवसाय या व्यवसायअंतर्गत, कंपनी तिच्या साठहून अधिक नाममुद्रा आधारित पीक संरक्षक उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीची विक्री व विपणन करते. हा जागतिक स्तरावर मॅन्कोझेबचा तिसऱ्या क्रमांकाची मोठी उत्पादक आहे आणि व्यवसायाच्या महसुलात ३७ टक्के निर्यातीचा वाटा आहे.

हेही वाचा – व्याजदर वाढीच्या धसक्याने सेन्सेक्समध्ये २५० अंशांची घसरण

जैविक व्यवसाय

कंपनीकडे वनस्पतींचे अर्क आणि सूक्ष्मजीव जैव-कीटकनाशकांवरील संयुगे संशोधनासह उत्पादन करण्याची क्षमता असून निर्यातीत ६५ टक्के वाटा असलेली ही मल्टिप्लेक्स मल्टिनीम (अझादिराचटिन) जगातील आघाडीची उत्पादक आहे. कंपनी अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये निर्यात करते. सेंद्रिय व्यवसायमातीचे आरोग्य, पोषण आणि सुधारणा या क्षेत्रातील उत्पादनांसह ही कंपनी भारतातील सर्वात मोठी सेंद्रिय खतांची विक्री करणारी कंपनी आहे. ते १.८ लाख टन सेंद्रिय खतांची विक्री करते. भारतात १७ उत्पादन प्रकल्प असलेली (यामध्ये ७ अत्याधुनिक संशोधन प्रयोगशाळा आहेत) आणि सर्वात मोठी कृषी किरकोळ साखळी असलेली कोरोमंडल ही एकमेव खासगी मोठी कंपनी आहे. कंपनीची ७५० हून अधिक किरकोळ विक्री केंद्रे असून तिथे कंपनी स्वतःचे उत्पादित आणि लेबल केलेल्या उत्पादनांची विक्री करते. यात पोषक तत्त्वे, पीक कीटकनाशके, बियाणे, पशुवैद्यकीय खाद्य आणि शेतीच्या अवजारांचा समावेश होतो. कंपनीचे भारतभरात २०,००० हून अधिक वितरक असून आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये कंपनीची लक्षणीय उपस्थिती आहे.

हेही वाचा – धडकी… धडधड

कंपनीची जगभरातील ८१ देशांमध्ये उपस्थिती आहे. कंपनीचे अमेरिका, कॅनडा, युरोप, जपान, चीन या देशांत विविध विपणन/तांत्रिक सहयोग आणि संयुक्त उपक्रम असून दक्षिण आफ्रिका आणि ट्युनिशियामध्ये फॉस्फोरिक ॲसिडचे संयुक्त उपक्रमही आहेत. नुकत्याच मार्चअखेर सरलेल्या आर्थिक वर्षात कंपनीने उलाढालीत तब्बल ५५ टक्के वाढ दाखवून ती २९,६२८ कोटी रुपयांवर गेली आहे. नक्त नफ्यातही ३२ टक्के वाढ होऊन तो २,०१३ कोटी रुपयांवर गेला आहे. भारत कृषिप्रधान देश असून आपल्या देशात शेतीला आणि शेतकऱ्यांनादेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. सॉइल हेल्थ कार्ड, डायरेक्ट बेनिफिट स्कीम, मेक इन इंडिया तसेच शेतमालाच्या निर्यातीला प्राधान्य या सर्वांचा फायदा कंपनीला होईल. उत्तम अनुभवी प्रवर्तक, कुठलेही कर्ज नसलेली कोरोमंडल इंटरनॅशनल तुमच्या पोर्टफोलिओला आगामी काळात झळाळी देईल हे नक्की. सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने समभाग खरेदीचे धोरण ठेवावे.

(stocksandwealth@gmail.com)