हे सदर सुरू झाल्यापासून त्याला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. सदर वाचून ज्यांनी आर्थिक नियोजनासाठी संपर्क केला त्यापैकी प्रीती दाते-जोशी यांच्या कुटुंबाची आजच्या नियोजनासाठी निवड केली आहे. जोशी कुटुंबात प्रीती दाते जोशी (३४ वर्षे), विशाल जोशी (३५ वर्षे) आणि त्यांची मुलगी धृती (३० महिने) असे तिघे आहेत. विशाल हे सरकारी बँकेत कार्यरत आहेत. प्रीती या संगणक अभियंता असून एका नवउद्यमीमध्ये (स्टार्टअप) पुण्यात नोकरी करतात. करोना काळात त्यांना नोकरी गमवावी लागली होती. सुमारे १८ महिन्यांच्या बेरोजगारीनंतर त्या १ डिसेंबरला नवीन ठिकाणी कामासाठी रुजू झाल्या. प्रीती यांनी वर्ष २०१८-१९ मध्ये ९ लाखांचे एक शैक्षणिक कर्ज घेतले होते या कर्जापैकी ३ लाखांची परतफेड झाली असून ६ लाखांचे कर्ज अद्याप फेडायचे आहे. करोनापूर्व काळात जोशी कुटुंबीय स्वत:ची सदनिका भाड्याने देऊन दुसऱ्या सदनिकेत भाड्याने राहात होते. करोना काळात नोकरी गेल्यानंतर स्वत:च्या घरी राहायला आले. त्यांची ३ वित्तीय ध्येये निश्चित करण्यात आली.येत्या दोन ते तीन वर्षात स्व-मालकीचे मोठे ‘टू बीएचके’ घर विकत घेणे. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी तरतूद करणे. सेवा निवृत्तीपश्चातच्या उदार निर्वाहाची तरतूद करणे. सध्या राहत्या घराव्यतिरिक्त जोशी कुटुंबीयांकडे दहा लाखांची रोकड सुलभता आहे. याव्यतिरिक्त काहीही गुंतवणूक नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा-  १९९१ चा अर्थसंकल्प 

कृती योजना

– बचत खात्यात दहा लाख रुपयांची रक्कम विनावापर पडून आहेत. यापैकी तीन लाख आपत्कालीन खर्चाकरिता ठेवून उर्वरित सात लाख रुपये खालीलप्रमाणे गुंतविणे.

रक्कम (रुपयांमध्ये) फंडाचे नाव

२ लाख कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप फंड

२ लाख निप्पॉन इंडिया मल्टिकॅप फंड

२ लाख फ्रँकलीन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड

१ लाख कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज फंड

– दहा लाखांच्या बँकेच्या मुदत ठेवी शैक्षणिक कर्जाच्या परत फेड करण्यासाठी वापरावे.- प्रीती आणि विशाल भविष्यात कर्ज घेणार असल्याने त्यांनी प्रत्येकी १ कोटी रुपयांचा शुद्ध विमा (टर्म इंश्युरन्स) खरेदी करावा.

आरोग्य विमा पुरेसा आहे.

हेही वाचा- वित्तरंजन : प्रजासत्ताक भारताचे पहिले अर्थमंत्री आणि अर्थसंकल्प

‘वन बीएचके’मधून ‘टू बीएचके’ मध्ये जाण्यासाठी सध्या २५ लाख अतिरिक्त हवे आहेत. घराच्या किंमतीत वार्षिक वाढ ७.५ टक्क्यांची गृहीत धरली तर, एका वर्षाने २७ लाख, २ वर्षांनी २९ लाख, ३ वर्षांनी ३१.५० लाख, ४ वर्षांनी ३३.७५ लाख आणि ५ वर्षांनी वर्षांनी ३६.४५ लाख रुपयांची गरज भासेल. या रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम जमा करण्यासाठी नियोजनबद्ध गुंतवणुकीच्या अर्थात ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन – एसआयपी’च्या माध्यमातून ३५ हजार रुपयांची गुंतवणूक करावी आणि वर उल्लेख केलेले सात लाख वापरावे लागतीत.- प्रीती आणि विशाल यांचा सध्याचा मासिक खर्च ३० हजार रुपये असून ते २०४९ मध्ये सेवा निवृत्त होतील. तेव्हा त्यांचा मासिक खर्च १.७० लाख रुपये असेल. (महागाईचा वार्षिक दर ७.५ टक्के) यापैकी २१ हजार रुपये ‘एनपीएस’मधून मिळतील. (वार्षिकी दर ४ टक्के)- यापैकी ६३ लाख राष्ट्रीय पेंशन योजनेतून तर सेवा निवृत्ती उदरनिर्वाहासाठी ५ कोटी सेवा निवृत्ती निधीची आवश्यकता आहे. यापैकी १.३० कोटी विशाल यांच्या भविष्य निर्वाह निधीतून येतील. उर्वरित ३.७० कोटींची तरतूद त्यांना करावी लागेल. यासाठी त्यांना २६ वर्षांसाठी २३ हजार रुपयांची एसआयपी सुरू करावी लागेल.

हेही वाचा- सोने २०२३ मध्ये कितपत चमकेल?

मुलीच्या उच्च शिक्षणाला २०३९ मध्ये सुरुवात होईल. २०३९ ते २०४४ दरम्यान २८ लाखांची आवश्यकता भासेल. याची तरतूद करण्यासाठी १२ हजार रुपयांची एसआयपी करावी लागेल.

जमा वेतन (हजार रुपये)             खर्च (हजार रुपये)

विशाल जोशी ५५                         घर खर्च ३०प्रीती दाते जोशी ४५             शैक्षणिक कर्जाचा हप्ता १८

बचत   ५२एकूण जमा १००                    एकूण खर्च     १००  

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to do financial planning for family and importance of financial planning dpj
First published on: 22-01-2023 at 13:27 IST