भारतातील आयातीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह (GTRI) च्या अहवालानुसार, चीनमधून इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीत घट झाली आहे. २०२२-२३ मध्ये चीनमधून लॅपटॉप, पर्सनल कॉम्प्युटर (पीसी), इंटिग्रेटेड सर्किट्स आणि सोलर सेल यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीत घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत चीनमधून आयात केलेल्या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात निर्भर आहे. परंतु भारतानं चीनमधून आयात कमी केल्यानं चीनला हा एक प्रकारचा धक्काच असल्याचं मानलं जात आहे.

…म्हणून झाली आयातीत घट

जीटीआरआयच्या अहवालानुसार, इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीत घट PLI (प्रॉडक्शन लिंक्ड इनिशिएटिव्ह) मुळे झाली आहे. केंद्र सरकारने मार्च २०२० मध्ये ही योजना सुरू केली. देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी आणि आयात बिल कमी करण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली, जी या अहवालात स्पष्टपणे दिसून येते. या योजनेंतर्गत केंद्र सरकार भारतात बनवलेल्या उत्पादनांच्या विक्रीच्या आधारे कंपन्यांना प्रोत्साहन देते.

२३ टक्के लॅपटॉप आणि ४ टक्के मोबाईल फोनची आयात कमी झाली

अहवालानुसार, २०२१-२२ च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात लॅपटॉप आणि पीसीची आयात २३.१ टक्क्यांनी कमी होऊन ४.१ अब्ज डॉलर आणि मोबाइल फोनची आयात ४.१ टक्क्यांनी घटून ८५७ दशलक्ष डॉलर झाली आहे. याशिवाय इंटिग्रेटेड सर्किट्सची इनबाउंड शिपमेंट ४.५ टक्क्यांनी घसरून ४.७ अब्ज डॉलर झाली. युरिया आणि इतर खतांची आयात २०२२-२३ मध्ये २६ टक्क्यांनी घसरून २.३ अब्ज डॉलर होईल.

वैद्यकीय उपकरणांची आयातही कमी झाली

वैद्यकीय उपकरणांची आयात २०२१-२२ च्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात १३.६ टक्क्यांनी घटून २.२ यूएसडी बिलियन झाली आहे. तसेच २०२२-२३ मध्ये सोलर सेल, पार्ट्स, डायोड्सची आयात ७०.९ टक्क्यांनी कमी होऊन १.९ अब्ज डॉलर झाली आहे.

हेही वाचाः मोठी बातमी! सार्वजनिक क्षेत्रातील आणखी अनेक बँका मोदी सरकार विकण्याच्या तयारीत

लिथियम आयन बॅटरीची आयात ९६ टक्क्यांनी वाढली

GTRI माहितीनुसार, भारताने लिथियम आयन बॅटरीच्या आयातीत विक्रमी वाढ नोंदवली आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताची लिथियम आयन बॅटरीची आयात जवळपास ९६ टक्क्यांनी वाढून २.२ अब्ज यूएसडी झाली आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या वेगाने वाढणाऱ्या मागणीमुळे ही वाढ नोंदवण्यात आली आहे. चीनमधून यंत्रसामग्री, रसायने, पोलाद, पीव्हीसी राळ आणि प्लास्टिकची वाढलेली आयात देखील समाविष्ट आहे.

हेही वाचाः मुलांसाठी म्युच्युअल फंड घेताय? जाणून घ्या नवा नियम, SEBI ने केला मोठा बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घट झाली असली तरी चीन हा सर्वात मोठा आयातदार

चीनमधून होणाऱ्या आयातीत घट झाली असली तरी भारत हा चिनी वस्तूंचा सर्वात मोठा आयातदार देश ठरला आहे. भारत अजूनही चीनच्या विविध वस्तूंवर अवलंबून आहे. २०२२-२३ मध्ये चीनमधून भारताची एकूण आयात ९१ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल. २०२१-२२ मध्ये ते ९४.६ अब्ज डॉलर होते. दुसरीकडे निर्यातीबाबत बोलायचे झाल्यास चीन; संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडनंतर अमेरिका हे भारताचे चौथे मोठे निर्यातीचे ठिकाण आहे.