(उत्तरार्ध)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक म्हणून १९७७ मध्ये मुकेश अंबानी यांची वर्णी लागली. ६ जुलै २००२ या दिवशी धीरुभाईंचे निधन झाल्यानंतर त्यांची कंपनीच्या अध्यक्षपदी निवड झाली.

धीरुभाई अंबानी यांच्या जन्मशताब्दी वर्षात, २८ डिसेंबर २०२२ या दिवशी आपल्या कर्मचाऱ्यांसमोर बोलताना त्यांनी कंपनीचे उत्तराधिकारी म्हणून आकाश अंबानी, ईशा अंबानी-पिरामल आणि अनंत अंबानी यांच्यावर पुढील जबाबदाऱ्या सोपवल्या. आकाशकडे जिओची सर्व जबाबदारी, ईशाकडे रिलायन्स रिटेलची, तर अनंतकडे नवीन ऊर्जा विभाग सोपवण्यात आला.

हेही वाचा – वित्तरंजन – भारताचे आर्थिक वर्ष

अनिल आणि मुकेश या दोन भावांमध्ये विसंवाद निर्माण झाला, त्यामुळे २००५ ला व्यवसायाची विभागणी करावी लागली होती. आलेल्या अनुभवावरून आपल्या मुलांमध्ये भांडणे होऊन पुन्हा आपल्या व्यवसायाची पुन्हा विभागणी होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या हयातीतच उद्याचे योग्य नियोजन केले असे म्हणता येईल, म्हणून आधी विलीनीकरण नि आता विलगीकरण असे धोरण बदलले आहे असे दिसून येईल.

आता फक्त सुरुवातीला जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचा विचार करायला हवा. रिलायन्सच्या भागधारकांना एकास एक या प्रमाणात विनामूल्य १० रुपये दर्शनी किमतीचा हा नवीन शेअर दर्शनी किमतीलाच मिळेल. विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही कालावधी द्यावा लागेल. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात नव्या कंपनीच्या शेअरची बाजारात नोंदणी होईल. यामुळे बाजारात दर्शनी किमतीस मिळणाऱ्या शेअरचा बाजारभाव काय राहील याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. निर्देशांकावर काय परिणाम होईल हा आणखी एक वेगळा विषय आहे. जर मागील अनुभव विचारात घेतला तर अनिल अंबानी यांच्याकडे ज्या कंपन्या आल्या त्या दिवशी मुंबई शेअर बाजार सुरू होण्याअगोदर एक तास जुनी रिलायन्स आणि अनिल यांच्याकडच्या नव्या कंपन्या यासाठी किंमत आणि बाजार मूल्यांकन शोधण्याची प्रक्रिया करण्यात आली आणि ती पूर्ण झाल्यानंतर मग नेहमीचे व्यवहार ठरावीक वेळेत सुरू झाले. या वेळेसदेखील मुंबई शेअर बाजार असेच करणार का याचे उत्तर अजून तरी मिळू शकलेले नाही.

हेही वाचा – ‘लार्ज आणि मिडकॅप’ श्रेणीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या फंडाची सर्वोत्तम कामगिरी

जेफरिज या प्रतिष्ठित अमेरिकी गुंतवणूकदार संस्थेच्या मते १३४ ते २२४ रुपये या किंमतपट्ट्यात नवीन कंपनीच्या समभागांची नोंदणी होऊ शकेल. त्याचबरोबर या संस्थेने रिलायन्सची किंमत ३,१०० रुपयांपर्यंत जाईल असे भाकीत केले आहे. हा सर्व थोडा गुंतागुंतीचा विषय आहे. यामुळे नवी कंपनी आणखी काय काय करणार, कोणत्या कंपन्यांना नवी कंपनी तीव्र स्पर्धा सुरू करणार, याबद्दलसुद्धा बाजारात चर्चा सुरू झाली आहे. नोमुरा या दुसऱ्या संशोधन करणाऱ्या संस्थेने आपला अहवाल प्रसिद्ध केला आहे, परंतु या संस्थेच्या मते रिलायन्सचा बाजारभाव २,८५० पर्यंत जाऊ शकेल.

थोडक्यात, २०२३ या आर्थिक वर्षात प्रथम रिलायन्स विलगीकरण आणि त्यानंतर एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बॅंक यांचे विलीनीकरण झाल्यानंतर एचडीएफसी बॅंकेचे बाजार मूल्यांकन काय होईल हासुद्धा एक बाजाराच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय राहील.

हेही वाचा – व्यापाऱ्यांनो लक्ष द्या! १ मेपासून बदलणार GST चे नियम, ७ दिवसांच्या आत बिल अपलोड करावे लागेल, अन्यथा…

गेल्या आठवड्यात लिहिलेल्या लेखामध्ये बाजारात कंपन्यांचा अभ्यास करताना फक्त ताळेबंदाचा अभ्यास महत्त्वाचा नसतो, तर कंपन्यांचे ताळेबंद ज्याच्या कर्तृत्वामुळे बनतात किंवा बिघडतात, त्या कंपन्या चालविणाऱ्या व्यक्तींचासुद्धा अभ्यास करावा लागतो.

रिलायन्स रिटेल काय करणार, कोणकोणती नवीन उत्पादने विक्रीसाठी बाजारात आणणार, बियाणी यांची आजारी कंपनी जी लिलावासाठी खुली झाली आहे ती कोणाला मिळणार, तिचे भवितव्य काय राहील हा पुन्हा एक वेगळाच विषय आहे. पूर्वी हे विषय सोपे होते, आता मात्र अवघड झाले आहेत.

हेही वाचा – जिऱ्याला हिऱ्याची झळाळी, ४०,००० रुपयांचे शिखर सर

वाॅरेन बफे हे बर्कशायर हाथवेज् या कंपनीचे उदाहरण असे आहे की, या कंपनीने बोनस, हक्क भाग (राइट्स शेअर) किंवा शेअर विभाजन हे भारतीय भांडवल बाजारात लोकप्रिय असलेले प्रकार त्यांनी कधी केले नाहीत. त्यामुळे कंपनीचा शेअरचा बाजारातील भाव सतत जास्तीत जास्त राहिला. एखादी कंपनी खरेदी करण्यासाठी रोखीच्या स्वरुपात जास्त पैसे मोजण्याऐवजी व्यवसाय खरेदी करायचा, त्यांना आपल्या कंपनीचे शेअर्स घ्यायचे, अशा प्रकारे शेअरचा उपयोग चलन म्हणून करण्यात आला, कदाचित रिलायन्स त्याचेच अनुकरण करेल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एम. एन. चैनी नावाचे रिलायन्सचे एक वरिष्ठ अधिकारी रिलायन्सबद्दल असे सांगायचे की, हा उद्योगसमूह एका व्यवसायात कधीच अडकून पडत नाही. अनंत अंबानी यांच्याकडे नवीन ऊर्जा विभाग देण्यात आला, कदाचित सोलर एनर्जी ही रिलायन्सची उद्याची ऊर्जा असेल.